AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | ना इकडे, ना तिकडे… पिता-पुत्रांचीच युती? पाहा Video

दिंडोरीतून अजित पवार गटानं नरहरी झिरवाळ यांचं नाव जाहीर विधानसभेसाठी जाहीर केलंय., दुसरीकडे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ सुद्धा तिकीटासाठी शरद पवार गटाच्या मंचावर गेले आहेत. मात्र गट-तट आणि पक्षाच्या वादात झिरवाळ पिता-पुत्रांचीच युती झालीय का अशीही चर्चा रंगतेय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | ना इकडे, ना तिकडे... पिता-पुत्रांचीच युती? पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 30, 2024 | 12:01 AM
Share

झिरवाळ पिता-पुत्राचं राजकारण सध्या सर्वसामान्यांना समजण्यापलीकडे गेलंय. वडिल अजितदादा गटात आहेत., आणि मुलगा शरद पवारांच्या मंचावरुन मविआसोबत आणाबाका घेतोय. वडिल झिरवाळांच्या मते त्यांचा मुलगा आज्ञाधारक आहे., पोरगा मात्र मविआतून लढण्याची इच्छा वर्तवतोय. झिरवाळ म्हणतायत मी कधीच गद्दारी केली नाही.,मात्र मुलाच्या प्रश्नावर आम्ही सांगतो एकीकडे आणि जातो दुसरीकडे असंच आमचं राजकारण असल्याचं झिरवाळ करतायत.

मुलगा म्हणतोय आम्ही शरद पवारांसोबत राहून निष्ठावंत राहिलो. यावर मग अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवाळ कोण, असा प्रश्न विचारल्यावर ते अजितदादांचे निष्ठावान असल्याचं उत्तर त्यांचे पुत्र देतायत. पहाटेच्या शपथेवेळी नरहरी झिरवाळ अजितदादांसोबत गेले होते. शपथेनंतर झिरवाळांचा पत्ता थेट दिल्लीजवळच्या एका हॉटेलात मिळाला. इकडे अजित पवारांचं सत्तानाट्य संपुष्ठात आल्यानंतर आपलं अपहरण झाल्याचा दावा झिरवाळांनी केला. मात्र आता तो एक बनाव होता, असं झिरवाळ म्हणतायत.

पाहा व्हिडीओ:-

शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आपण हटणार नसल्याचं विधान झिरवाळांनी केलं होतं. 30 दिवसांनी झिरवाळच सर्वात अजित पवारांच्या गटात सामील होण्यास आघाडीवर राहिले. झिरवारांच्या या भूमिकेवर विरोधक सवाल करतायत. मविआसोबत असताना विधानसभा उपाध्यक्ष या नात्यानं शिंदेंचे आमदार अपात्र होणारच असा दावा झिरवाळ करायचे. मात्र अजितदादांसोबत सत्तेत गेल्यानंतर आता आपण सत्तेत आल्यामुळे कसं बोलणार असं झिरवाळ जाहीरपणे म्हणाले.

तूर्तास दिंडोरीत काय घडतं, मुला विरुद्ध वडिलांची लढाई होते. दोघांपैकी एक माघार घेतो की की मग दोन राष्ट्रवादीतल्या लढाईमध्ये झिरवाळ पिता-पुत्रांची चर्चेतली कौटुंबिक युती घरातच उमेदवारी मिळवण्यात यशश्वी ठरते हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow Us
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?