
दोन्ही घटनेत पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्न उभे राहिले. दोन्ही ठिकाणी राजकीय दबावापोटी पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप झाला. बंगालमध्ये संत्पत जमावानं घटना घडलेल्या रुग्णालयात तोडफोड केली. इकडे बदलापुरातही लोकांनी शाळेत शिरुन संताप व्यक्त केला.
पश्चिम बंगालच्या घटनेवरुन सत्ताधारी भाजप विरोधकांना घेरत होते. आता विरोधक बंगालच्या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना सवाल करतायत. भाजपच्या चित्रा वाघांसहीत अनेकांनी कोलकातातल्या घटनेवरुन मोर्चा काढला होता. आता बदलापूरच्या घटनेबद्दल त्यांनी पोलिसांना गृहमंत्री फडणवीसांनी योग्य कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं म्हटलंय. मात्र बदलापुरातले लोक इतके आक्रमक का झाले. पोलिसांनी कुणाच्या आदेशावरुन तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केली. याचा छडा अद्याप लागलेला नाही. बदलापुरात घडलं काय आणि इतका असंतोष का उफाळून आला ते समजून घेऊयात.
शाळेत तोडफोडीनंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करुन जमावाला पांगवलं. नंतर एक जमाव बदलापूर स्टेशनवर रुळावर येवून बसला. तिथं काही काळानंतर पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केल्यामुळे जमाव अजून भडकल्यामुळे दगडफेक सुरु झाली.
पाहा व्हिडीओ:-
लोकांच्या उद्रेकानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, एक हेड कॉन्स्ट्टेबल, एक पीआय निलंबित करण्यात आले आहेत. दुसरीकडे शाळेनं माफीनामा जाहीर केला. मुख्याध्यापिकेसह मुलांची जबाबदारी असय़णाऱ्या दोन सेविकांनाही निलंबित केलं. प्रकरणात दिरंगाई झाली., गुन्हे उशिरानं नोंदवले गेले. त्यावरुनच उद्रेक झाला. अखेर अधिकाऱ्यांना सस्पेंडही करण्यात आलंय. मात्र गृहमंत्री फडणवीसांच्या मते कारवाई तात्काळ झाली. पण तरी दिरंगाई झाली असल्यास चौकशीचं आश्वासन दिलंय.
संबंधित शाळेवरचे पदाधिकारी हे भाजपशी संबंधित असल्यामुळेच प्रकरण दाबण्याचा डाव होता, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय., त्यावर कोणतंही उत्तर न देता विरोधकांना यावर निव्वळ राजकारण करायचं असल्याची टीका गृहमंत्री फडणवीसांनी दिलीय. तूर्तास कोलकाता आणि बदलापूर या दोन्ही घटनांनी देश ढवळून निघालाय. त्यामुळे नियमित पद्धतीऐवजी अशा घटनांत दोषींना तातडीनं शिक्षा देवून धाक बसवण्याची गरज आहे.