AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 स्पेशल रिपोर्ट, कसब्यातल्या काँग्रेसच्या विजयावर बोलणं म्हणजे… शिंदेंचा आपल्या उत्तरातून सिक्सर!

अजित पवारांनी तुफान फटकेबाजी करत शिंदेंना चांगलचे चिमटे काढले होते. पण शिंदेंनीही आपल्या स्टाईलनं समाचार घेतलाय

Tv9 स्पेशल रिपोर्ट, कसब्यातल्या काँग्रेसच्या विजयावर बोलणं म्हणजे... शिंदेंचा आपल्या उत्तरातून सिक्सर!
| Updated on: Mar 04, 2023 | 12:42 AM
Share

मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जुगलबंदी रंगली. आधी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी करत शिंदेंना चांगलचे चिमटे काढले होते. पण शिंदेंनीही आपल्या स्टाईलनं समाचार घेतलाय. पाहुयात

विधानसभेत अजित पवारांनी शिंदेंना ज्याप्रकारे डिवचलं होतं. त्याची उत्तर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. कसब्यात भाजपच्या पराभवानंतर फडणवीस-शिंदेंच्या रोड शोवरुन आणि आयोगाच्या निर्णयावरुन अजित पवारांनी बदला घेतल्याचं म्हटलं होतं. त्यावर शिंदेंनी आपल्या उत्तरातून सिक्सर मारला.

एसटीवरील जाहिरातीचा फोटो भर सभागृहात दाखवून अजित दादांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता शिंदेंनी गतीमान महाराष्ट्र करणार असं सांगत, माझं कुटुंब, माझी जबाबदारी या ठाकरे सरकारच्या जाहिरातीवरुन टोला लगावला.

अजित पवारांबरोबरच, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंच. कसब्यातल्या काँग्रेसच्या विजयावर बोलणं म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी टीका शिंदेंनी केलीय. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना, अजित पवारांनी शिंदे फडणवीसांना चांगलेच टोले लगावले होते पण शिंदेंनी 24 तासांच्या आत परतफेड केलीच.

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....