AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करायचा असल्यास…’; कोर्टाने निवडणूक आयोगाचेही कान टोचले

अटीसह घड्याळ चिन्ह वापरा, असे निर्देश कोर्टानं अजित पवारांच्या गटाला दिले आहेत. मात्र कोर्ट काय म्हणालं., यावरुन दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोपांची सुरुवात झालीय. नेमका काय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट.

'अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करायचा असल्यास...'; कोर्टाने निवडणूक आयोगाचेही कान टोचले
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 20, 2024 | 11:36 PM
Share

मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह तर मिळालं. मात्र अद्यापही ते प्रकरण कोर्टात असल्यानं घड्याळ चिन्ह वापरताना ”प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे” असं लिहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोर्टानं निवडणूक आयोगाचेही कान टोचलेत. कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सूचना दिल्या आहेत की, घड्याळ या चिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याची मराठी, हिंदी, इंग्रजी या वृत्तापत्रातून जाहीर नोटीस प्रसिद्धीस द्या.

नोटीसमध्ये घड्याळ या चिन्हाचा वाद कोर्टात असून ते कायमस्वरुपी वापरावं की नाही, हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल असं नोटीसमध्ये नमूद करण्याचं कोर्टानं बजावलंय शिवाय पक्षाची जाहिरात बॅनर, पोस्टर किंवा इतर वापरावेळीही हे घड्याळ चिन्हाच्या वापराचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा संदेश लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कोर्टात याचिका केली होती. ज्यात राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. अनेक ठिकाणी घड्याळ म्हणजे शरद पवारांचा पक्ष मानला जातो. असा आक्षेप शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला. त्यावर निवडणूक होईपर्यंत तुतारी चिन्ह हे शरद पवारांना तर घड्याळ हे चिन्हा अजित पवारांना वापरण्यास कोर्टानं परवानगी दिली., मात्र घड्याळाचा वाद कोर्टात असल्यामुळे ते वापरताना सूचनाही दिल्या. निवडणूक आयोगाकडे जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला होता. तेव्हा निवडणूक आयोगानं पक्षाची घटना किंवा पक्षाची संरचना या मुद्दयांऐवजी विधानसभेतलं संख्याबळ कुणाकडे या आधारावर अजित पवारांना राष्ट्रवादीची मालकी दिली होती. त्यावरुनही कोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले.

पाहा  व्हिडीओ:-

कोर्टानं म्हटलं की, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीऐवजी फक्त आमदारांच्या संख्येवर निवडणूक आयोग मूळ पक्ष कुणाचा हे ठरवत असेल, तर निवडणूक आयोग पक्षातील फूट मान्य करत नाही का? दहाव्या परिशिष्टात राजकीय पक्षातील फुटीला मान्यता देता येत नाही. ही बाब दुर्लक्षित केली तर आयोगाने बंडखोरीला मान्यता दिल्यासारखे ठरते. त्याआधारे फुटीर गट निवडणूक चिन्हावर दावा करू शकतील, ही मतदारांची थट्टा नाही का? बंडखोरीला प्रोत्साहन देणे हा दहाव्या परिशिष्टाचा हेतू नाही., अशा शब्दात कोर्टानं निवडणूक आयोगाला खडसावलं आहे.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष