नवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Sep 23, 2020 | 9:45 PM

सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र, दसरा सण साधेपणाने साजरा करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. (Uddhav Thackeray appeal to celebrate navratra festival simple manner)

नवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन केले आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलेय. गणपती उत्सवादरम्यान प्रशासनास ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.(Uddhav Thackeray appeal to celebrate navratra festival simple manner)

लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक लवकरच काढणार

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते. त्याचप्रमाणे या नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी या  सणांबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सर्व धर्माच्या नागरिकांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे केल्या बद्दल उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच अभिनंदन केले आहे.

कोरोनाची लढाई आक्रमकपणे सुरू

दरम्यान,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. माझे कुटुंब , माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोरोना विरुद्धची लढाई अधिक आक्रमकपणे लढतोय. आमच्या प्रयत्नांचा परिणाम येणाऱ्या दिसून येईल. पुढील काळात मृत्यूदर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर  कमी झालेला आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

संबधित बातम्या:

मराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे 8 मोठे निर्णय

तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

(Uddhav Thackeray appeal to celebrate navratra festival simple manner)