Uddhav Thackeray: TMC फुटली…ऑपरेशन टायगरची धास्ती… मातोश्रीवर हालचाली… उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली… कोण मारणार दांडी?

Uddhav Thackeray Operation Tiger Matoshree MP Meeting: देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात आता मुंबईतही वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी शिंदे सेनेच्या मंत्री आणि आमदारांनी ऑपरेशन टायगरला पुन्हा हवा दिली.

Uddhav Thackeray: TMC फुटली...ऑपरेशन टायगरची धास्ती... मातोश्रीवर हालचाली... उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली... कोण मारणार दांडी?
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, ऑपरेशन टायगर
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 14, 2026 | 9:24 AM

Uddhav Thackeray MP Meeting: देशात पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप आला आहे. आता भूकंपाचे केंद्र मुंबईकडे हलण्याची भीती व्यक्त होत आहे. ऑपरेशन टायगरची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. शिंदे सेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आणि आमदार निलेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दरम्यान मातोश्रीवर आज (14 जून) उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या बैठकीवेळी परभणीचे खासदार संजय जाधव यांची गैरहजरी होती. यावेळी कोण या बैठकीकडे पाठ फिरवते याची चर्चा सुरू झाली आहे.

तातडीने मुंबई गाठा

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. लोकसभेत शिवसेना ठाकरे सेनेचे 9 खासदार आहेत. यातील 6 खासदार हे शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा सूर आळवल्या जात आहे. मराठवाड्यातील तीन खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी एका कार्यक्रमात याविषयीचे मोठे वक्तव्य केले होते. तर आमदार अंबादास दानवे हे सध्या संपर्क दौऱ्यावर असताना खासदार ओमराजे निंबाळकर हे काही कारणामुळे अनुपस्थित होते. तर काल हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरही बैठकीला हजर नव्हते. आजच्या बैठकीला कोण दांडी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देतात याबाबत उत्सुकता आहे.

सात खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात?

उद्धव सेनेचे महाराष्ट्रात 9 खासदार आहेत. त्यातील 6-7 खासदार शिंदे सेनेच्या गळाला लागण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 जून रोजी या खासदारांसोबत दिल्लीत बैठक केल्याचा दावाही करण्यात येतो. ऑपरेशन टायगर हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. ते लवकरच पूर्ण होईल. आमचे नेते एकनाथ शिंदे हे त्यासाठीचा मुहूर्त लवकरच निश्चित करतील असे मोठे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी परभणीतील गंगाखेड येथे केले. तर दुसरीकडे या बैठकीला किती खासदार-आमदार उपस्थिती लावतात हे पाहाच अशा आशयाचे वक्तव्य आमदार निलेश राणे यांनी करून मोठे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार

ओमराजे निंबाळकर, धाराशिव

संजय जाधव, परभणी

नागेश पाटील-आष्टीकर, हिंगोली

संजय देशमुख, यवतमाळ

भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी

राजाभाऊ वाजे, नाशिक

अरविंद सावंत, दक्षिण मुंबई

अनिल देसाई, दक्षिण-मध्य मुंबई

संजय दीना पाटील, उत्तर पूर्व मुंबई

Follow Us