AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: अन्नत्याग आंदोलनकर्त्याची तब्येत खालवली… रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी… शेतकरी नेत्यांसह कोण कोण आंदोलनस्थळी

Rohit Pawar on CM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना मोठे आवाहन केले आहे.

Rohit Pawar: अन्नत्याग आंदोलनकर्त्याची तब्येत खालवली... रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी... शेतकरी नेत्यांसह कोण कोण आंदोलनस्थळी
रोहित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 14, 2026 | 8:38 AM
Share

Rohit Pawar Hunger Strike At Pandharpur: सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी विठूरायाच्या साक्षीने पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. एका आंदोलनकर्त्याला चक्कर आल्याने आणि अस्वस्थ वाटल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना रोहित पवार यांनी मोठे आवाहन केले आहे.

रोहित पवार यांनी डागली तोफ

मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे आंदोलन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. कृषिमंत्री यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे आंदोलन गेले आहे. मंत्री दत्तामामा भरणे यांनी चर्चा केल्या आहेत. मुख्यमंत्री तहसीलदारांना सांगूनही संपर्क साधू शकतात. पण ते बोलत नाहीत, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. संपूर्ण कर्जमाफी करावी. कर्जमाफीतील सर्व जाचक अटी मागे घ्याव्यात असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

तर उद्या संत नामदेव पायरीजवळ आंदोलन

आज सरकारने निर्णय नाही घेतला तर उद्या सकाळी संत नामदेव पायरी जवळ आंदोलन करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला. अजितदादा असते तर ते पहिल्यांदा भेट द्यायला आले असते. अजितदादांची मला आठवण येते, असे भावनिक वक्तव्य सुद्धा आमदार रोहित पवार यांनी केले. त्यावेळी वातावरण भावनिक झाले होते. आज निर्णय नाही झाला तर उद्यापासून राज्यभर कार्यकर्ते आंदोलन करतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. माझ्यावर ज्यांनी टीका केली त्यांना अधिवेशन काळात मी दाखवून देईल, असे प्रत्युत्तरही त्यांनी टीकाकारांना दिले.

कोण कोण आंदोलनस्थळी

आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनावर भाजपच्या गोटातून तीव्र टीका होत आहे. आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज जरांगे पाटील , संजय राऊत , राजू शेट्टी , हर्षवर्धन सपकाळ , शशिकांत शिंदे यांच्यासह दिल्लीतील नेते हजेरी लावणार आहेत. रक्तातील साखर कमी झाली. पण मी सहन करतोय असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार