AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाने तुमच्यावर हेच संस्कार केले काय?; ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत सवाल

आम्ही खोके घेतले असं खुद्द आमदार महेश शिंदे सांगत आहेत. मग या प्रकरणाची एसआयटी चौकशी का केली जात नाही? हा एसआयटी चौकशीचा विषय नाही का?

संघाने तुमच्यावर हेच संस्कार केले काय?; 'सामना'तून देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत सवाल
संघाने तुमच्यावर हेच संस्कार केले काय?; 'सामना'तून देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत सवालImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 26, 2022 | 7:29 AM
Share

मुंबई: दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. त्यामुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अडचणीत आले आहेत. सरकारचा हा निर्णय ठाकरे गटाच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता थेट चौकशीचे आदेश देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर ठाकरे गटाने या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांचे संस्कारच काढले आहेत.

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचे संस्कार काढण्यात आले आहेत. 110 कोटींचे भूखंड घशात अडकले तरी देवेंद्र फडणवीस हे त्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे आणि भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे. संघाचे संस्कार ते हेच म्हणावेत काय?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नागपूरच्या भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फडणवीसांनी एसआयटी नेमायची होती. तसं केलं असतं तर फडणवीस यांचं चरित्र उजळून निघालं असतं, असा चिमटाही काढण्यात आला आहे.

या अग्रलेखातून शिंदे गटाच्या आमदारांवरही टीका केली आहे. आम्ही खोके घेतले असं खुद्द आमदार महेश शिंदे सांगत आहेत. मग या प्रकरणाची एसआयटी चौकशी का केली जात नाही? हा एसआयटी चौकशीचा विषय नाही का? असा सवाल करतानाच राज्य सरकारकडून गाडलेले विषय उकरून त्याची चौकशी लावली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

खोके सरकारने ज्यांना आज होलसेलात क्लीन चिट दिली त्या सगळ्यांचा आणि शंभर उंदरांचा फडशा पाडून काशीला पोहोचलेल्या 40 फुटीर बोक्यांचा आनंदही औटघटकेचाच ठरेल याविषयी आमच्या मनात शंका नाही, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नागपुरातील थंडीत या बोक्यांचे आणि त्यांच्या खोके सरकारचे मेंदू गोठून गेले. भारतीय जनता पक्षाला हवे तेच शेवटी घडले व अधिवेशनात चिखलफेकीस उत्तेजन देऊन छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा ज्वलंत विषय मागे ढकलण्यात यश मिळवले. शिवरायांवर इतर विषयांनी कुरघोडी केली हे दुर्दैवच म्हणावे लागेल! ठग-पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.