Uddhav Thackeray : फडणवीसांना आणखी एक लाख रुपये देतो, पण… उद्धव ठाकरेंनी काय दिलं नवं चॅलेंज?

"उद्या ते वेगळे होतील. तुम्ही आम्ही काय ठरवणार. उद्या दोन पवारांच्या युतीत राष्ट्रवादीची सत्ता आली आणि त्यांनी भाजपला लाथ मारली तर त्याला काय करायचं. म्हणून दुसऱ्यांच्या डोक्यात काय चाललंय त्यावर का बोला. आपल्या डोक्यात काय चाललंय ते बोलूया" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : फडणवीसांना आणखी एक लाख रुपये देतो, पण... उद्धव ठाकरेंनी काय दिलं नवं चॅलेंज?
Mahayuti
| Updated on: Jan 10, 2026 | 1:50 PM

“वोट कापण्याचं पॉलिटिक्स असू शकतं. मला ध्रुवीकरणाच्या फंदात पडायचं नाही. ही महापालिकांची निवडणूक आहे. सत्तेवर असतो तेव्हा आम्ही संविधानाची शपथ घेतो. कुणाशी भेदभाव करणार नाही. महापालिकेत मी कोणत्या पदावर नव्हतो. पण माझ्या पक्षाची सत्ता होती. 25 वर्ष सत्ता का दिली तर आम्ही भेदभाव करत नाही. बेस्टमधून सर्व त्याच दरात प्रवास करतात. कोस्टल रोडवर पाटी नाही की अमूक लोकांनी प्रवास करावा. पाणी सर्वांना समान मिळतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली.

“त्यांना उमेदवार टाकू द्या. माझा मुंबईकरांवर विश्वास आहे. त्यामुळे मुंबई मॉडेल अभिमानाने दाखवू शकतो. फडणवीस यांनी त्यांच्या मोदी सरकारसह त्यांच्या राज्यांमधील सत्तेचं असं मॉडल दाखवावं. मी आणखी एक लाख रुपये देतो. त्यांनी आम्ही केलेल्या कामासारखं कामे दाखवावी. आम्ही कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याचं जगाने कौतुक केलं. हे सुरु असताना गंगेत प्रेतं वाहत होती. ती हिंदूची होती की मुस्लिमांची हे फडणवीस यांनी सांगावं. तसेच गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटत होत्या. त्या हिंदू कि मुस्लिमांच्या होत्या हे फडणवीस यांनी सांगावं. आम्ही हिंदू मुस्लिम केलं नाही. सर्वांना पाहिलं. भेदभाव केला नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कारण त्यांच्या अंगलट आलं आहे

“दादा आणि भाजपचं लागलं. आता ही नुरा कुस्ती आहे हे आतापर्यंत दिसतं. पण या निवडणुकीत वेगळंपण दिसतं. दोन पवारांचं एकत्रिकरण दिसतं. दुसऱ्या बाजूला महेश लांडगे आरोप करत आहेत. आजपर्यंत भाजपने अजित पवारांवर ब्र काढला नव्हता. फडणवीस काही बोलत नाही. कारण त्यांच्या अंगलट आलं आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांसोबत मी जात नाही. भाजपमधून अजितपवारांवर आरोप सुरू झाले. अजित पवार त्यांच्यावर बोलत आहेत. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेस सोबत युती केली. अकोटमध्ये भाजप एमआयएमसोबत युती केली. आणि परभणीत शाह सेनेने एमआयएम सोबत गेले” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.