बाईच्या डोक्यावर अपघात झाला काय?; उर्मिला मातोंडकर यांचा कंगनावर निशाणा

बाईच्या डोक्यावर अपघात झाला की काय?, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. (urmila matondkar slams Kangana Ranaut over mumbai issue)

बाईच्या डोक्यावर अपघात झाला काय?; उर्मिला मातोंडकर यांचा कंगनावर निशाणा
| Updated on: Dec 29, 2020 | 7:18 PM

मुंबई: मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेला डिवचणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाईच्या डोक्यावर अपघात झाला की काय?, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. (urmila matondkar slams Kangana Ranaut over mumbai issue)

उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून कंगनावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे. बाईंच्या डोक्यारवर अपघात झाला आहे का हो भाऊ?, असं ट्विट उर्मिला यांनी केलं आहे. तसेच माझ्या प्रिय मुंबईच्या पाठी उभं राहण्यासाठी हे ट्विट असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. उर्मिला यांनी या आधीही कंगनावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे पुन्हा उर्मिला आणि कंगनामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक धुरळा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंगना काय म्हणाली होती?

कंगना रनौत आज सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती. यावेळी तिने मीडियाशी हसतखेळत संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत तिने शिवसेनेला डिवचले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रानौतने त्यावर बोलायचे टाळले. (urmila matondkar slams Kangana Ranaut over mumbai issue)

 

संबंधित बातम्या:

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगना रनौत म्हणाली जय महाराष्ट्र

LIVE | मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारी पर्यत बंद राहणार

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, तीन नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन

(urmila matondkar slams Kangana Ranaut over mumbai issue)