AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, तीन नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन

थोड्याच वेळात वर्षा निवासस्थान इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देणार औपचारिक पक्षप्रवेश देण्यात येणार आहे.

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, तीन नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन
| Edited By: | Updated on: Dec 29, 2020 | 5:50 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. थोड्याच वेळात वर्षा निवासस्थान इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औपचारिक पक्षप्रवेश देण्यात येणार आहे. (Navi Mumbai BJP three corporators will join shivsena big loss to ganesh naik)

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन गवते , दिपा गवते आणि अपर्णा गवते या भाजपला सोडसिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधणार आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडत असल्याने नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. खरंतर, आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही खुद्द गणेश नाईक हे भाजप सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता पक्षात इनकमिंग सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेले नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येऊ शकतात, असं जयंत पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या यादीत नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या होत्या. पण आता पक्षातील सच्चे समर्थक साथ सोडत असल्याने नवी मुंबईत भाजपला पुन्हा खिंडार पडणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते गणेश नाईक ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले होते. नाईक यांनी भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केलं होतं. पक्ष प्रवेशाच्या खोट्या बातम्या पेरुन विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचा टोलाही गणेश नाईकांनी लगावला होता.

संबंधित बातम्या – 

मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला, संजय राऊत बिथरल्याची टीका

काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

(Navi Mumbai BJP three corporators will join shivsena big loss to ganesh naik)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.