AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला, संजय राऊत बिथरल्याची टीका

"काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा", असा टोला आशिष शेलार यांनी लगावला (Ashish Shelar slams Congress and Shivsena).

मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला, संजय राऊत बिथरल्याची टीका
Ashish Shelar
| Updated on: Dec 29, 2020 | 4:10 PM
Share

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी यबाबत माहिती दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या याच निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. त्यांनी आज (29 डिसेंबर) ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेस नेते म्हणतात, श्रेष्टींनी ठरवलं तर आम्ही महापौर बसवू, क्रॉफर्ड मार्केटमध्ये एखादा आयटम विकत घ्यावा, असं काही निवडणुकीतील पद आहे का? इतक्या सहजपणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकता येत नाही”, असं आशिष शेलार म्हणाले (Ashish Shelar slams Congress and Shivsena).

“काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा. बरं हे आम्ही म्हणत नाही तर तुमच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ती शिवसेना म्हणत आहे. तुमच्यासोबत मतदार राहिले नाही. तुमचे नेते राहुल गांधी आता बिनकामाचे झाले ही शिवसेनाच म्हणते”, असा टोला शेलारांनी लगावला.

“महापौराच्या गप्पा मारणे खूप मोठी गोष्ट आहे. महापालिकेत आज विरोधीनेतेपद शिवसेनेच्या जीवावर मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं”, असा चिमटा त्यांनी काढला (Ashish Shelar slams Congress and Shivsena).

“ही महाविकास आघाडी नैसर्गिक आलायन्स नाही. त्यांच्या भांडणात आम्हला रस नाही. पण त्यांच्या भांडणामुळे विकासाला खीळ बसतेय. हे सरकार आपआपसातल्या विसंवादामुळे पडेल. पण तोपर्यंत लोकांचं नुकसान खूप होईल, याची आम्हला चिंता आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

यावेळी शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत. त्यामुळे त्यांचं विधान आता जनताही गांभीर्याने घेत नाही. तीन काय, तीस काय वाटेल ते आकडे बोलतायत. त्यांनी काय स्पाय लावून ठेवले आहेत काय? शिवसेना जर अशा पद्धतीने स्पाईनिग करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? हाच खरा प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.

काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत आणि महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चालते. महापालिका आणि महाआघाडीचा काहीच संबंध नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत 227 जागांवर लढण्याचा आमचा विचार आहे”, अशी भूमिका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडली आहे.

हेही वाचा : शिवसेनेचा वकील मंत्री संजय राऊतांच्या भेटीला; ED नोटीसच्या कायदेशीर बाबींवर चर्चा

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.