महाराष्ट्रात लसीकरणासाठी ‘केरळ पॅटर्न’ वापरा; शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: May 10, 2021 | 2:52 PM

केरळमध्ये उपलब्ध लसींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले. | covid vaccination

महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न वापरा; शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबई: राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्रही पाठवले आहे. (Shivsena letter Deepak Sawant wrote letter to CM Uddhav Thackeray for covid vaccination strategy)

केंद्र सरकारकडून केरळला 73लाख 26 हजार 806 लस प्राप्त झाल्या. मात्र, त्यामधून 74 लाख 26 हजार 164 लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे 88 हजार जास्त लोकांना लस देण्यात केरळ सरकारला यश मिळाले आहे. लसीची थोडी मात्रा फुकट जाऊ न दिल्यामुळे केरळला ही गोष्ट साध्य झाल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यासाठी लसीकरण केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले. लसीच्या एका कुपीतून 10 लोकांना लस देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात केली जात नसे. 0.5 ml त्याप्रमाणात डोस कमी न करता ही लस दिली. त्यासाठी Auto disposable syringe वापरण्यात आल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

असाच प्रोटोकॉल महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात लसीकरण पुरवठयावरना होणाऱ्या वादावर तोडगा निघू शकतो असा विश्वास माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

‘ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय’

राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला. लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र, ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

ग्रामीण भागात कोरोना वाढला, महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने पाठवली मोठी आर्थिक रसद

आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ

आमच्यावर विश्वास ठेवा, सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

(Shivsena letter Deepak Sawant wrote letter to CM Uddhav Thackeray for covid vaccination strategy)