AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना मिळणार गुडन्यूज, लवकरच धावणार ‘वंदे भारत’ लोकल?

मुंबईकरांना २ वंंदे भारत ट्रेन मिळाल्यानंतर आता लवकरच आणखी एक गुडन्यूज मिळणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांना प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे.

मुंबईकरांना मिळणार गुडन्यूज, लवकरच धावणार 'वंदे भारत' लोकल?
mumbai vande bharat local
| Updated on: Mar 14, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई : देशात वंदे भारत ( Vande Bharat train ) ट्रेनची क्रेज पाहायला मिळते आहे. वंदे भारत ट्रेनचा लूक अनेकांना आवडलाय. अनेक जण या ट्रेनमधन प्रवास करण्यासाठी इच्छूक आहेत. वंदे भारत ट्रेनमुळे भारतीय रेल्वेची नक्कीच चर्चा आहे. म्हणून रेल्वे बोर्ड मुंबईत अशाच प्रकारची लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार करत असल्याचं समोर आलंय. वंदे भारत सारखी लोकल ट्रेन ( Vande Bharat Local Train ) लवकरच मुंबईत धावणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच गुडन्यूज मिळू शकते.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 1 फेब्रुवारी रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पनेची घोषणा केली. ‘मेड इन इंडिया’ वंदे मेट्रो ट्रेन या वर्षी डिसेंबरपर्यंत तयार होतील आणि 2024 पर्यंत ते धावतील अशी शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मुंबईत वंदे भारत रेल्वे सारखी लोकल धावण्याची शक्यता आहे.

वंदे लोकल ही लोकप्रिय वंदे भारत ट्रेनची एक छोटी आवृत्ती असेल. ज्यामुळे प्रवाशांना नक्कीच अधिक वेग आणि आराम मिळेल. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात (MMR) AC LOCAL ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी जाहीर केले की, “रेल्वे बोर्ड शहरात वंदे भारत सारख्या लोकल गाड्या चालवण्याच्या शक्यतेचा विचार करत आहे.”

वैष्णव यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले की, लोकांना कामासाठी किंवा विश्रांतीसाठी मोठ्या शहरात यावे लागते. तसेच पुन्हा घरी जायचे असते. त्यासाठी आम्ही वंदे भारतच्या बरोबरीने वंदे मेट्रो आणत आहोत. या वर्षी त्याचे डिझाइन आणि उत्पादन पूर्ण होईल आणि पुढील आर्थिक वर्षात ही ट्रेन सेवेत येईल. जी प्रवाशांना जलद शटल सारखा अनुभव देईल.

वंदे मेट्रोची संकल्पना युरोपच्या ‘प्रादेशिक ट्रान्स’ गाड्यांसारखी सांगितली जात आहे. या लोकल गाड्यांसारख्या असतील पण वेगाने प्रवास करतील. ही एक हायस्पीड ट्रेन असणार आहे जी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या शटलचा अनुभव देईल.

रेल्वेने देशभरातील शहरांतर्गत प्रवाशांसाठी वंदे मेट्रो रॅपिड आणि वंदे मेट्रो प्रादेशिक अशा दोन प्रकारच्या वंदे मेट्रो सेवा ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.