AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल

एकीकडे महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आधीच मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यात आता भरीसभर भाजीपाल्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल
भाजीपाल्याच्या दरात घसरण Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 4:05 PM
Share

राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे दोन आठवडे पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. पावसाभावी पिकं वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. अखेर शनिवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के भागामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. पाऊस न पडल्यामुळे शेतकरी आधीच मोठ्या संकटात आहे. तर दुसरीकडे आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भाजीपाल्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे.

एपीएमसी बाजारात भाज्यांचे आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून भाजीपाल्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याने बाजारातील दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

एकीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून, दुसरीकडे मागणी कमी असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दर मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाले आहेत. येत्या काही दिवसांतही भाजीपाल्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गणपती उत्सवातील मागणी आणि बाजारातील आवक यावर आगामी काळातील दर अवलंबून राहणार आहेत, अशी माहिती देखील यावेळी व्यापाऱ्यांनी दिली आहे.

दुष्काळ जाहीर 

दरम्यान राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. मोफत अन्न धान्याचं वाटप, जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी, जनावरांसाठी चाऱ्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध उपाय योजना दुष्काळी भागात सरकारच्या वतीने राबवण्यात येणार आहेत.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला