
खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कराड एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आरोपीला सोडून देण्यास सांगताना दिसत आहेत. शिवाय बीड जिल्ह्याचा मीच बाप आहे, असं म्हणतानाही वाल्मिक दिसत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण काय आहे? ही महिला पोलीस अधिकारी कोण आहे? आरोपी कोण आहे? असं काय घडलं होतं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ती क्लिप डीलिट करू नका. हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे 15 दिवस चालणार आहे, असं मोठं विधान केल्याने या प्रकरणाचा सस्पेन्स अजूनच वाढला आहे.
भाजप आमदार सुरेश धस हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या क्लिपचा सीरिअसनेस तुम्हाला माहीत नाही. मला त्याचं गांभीर्य माहीत आहे. वाल्मिकने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला? ही महिला अधिकारी कोण आहे? तो आरोपी कोण आहे? आकाने फोन करण्याचं कारण काय? या सर्व गोष्टी मला माहीत आहे. तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या. नंतर मला विचारा. मी तुम्हाला उत्तर देईन, असं सुरेश धस म्हणाले.
किरकोळ केस आहे हे कोण म्हणालं? मी नाही म्हणालो. त्या क्लिपमध्ये आलंय. आकाने कोणत्या महिलेला फोन केला? प्रकरण काय आहे? हे मीडियाने बाहेर आणावं. त्यावर मी नंतर उत्तर देईल. या क्लिपच्या संदर्भात माझ्याकडे भरपूर माहिती आहे. पण याचं उत्तर मी आज देणार नाही.
माझी अपेक्षा आहे की, ही मुंबईची मीडिया आहे. तुम्ही मंत्रालयातील पत्रकार आहात. म्हणजे तुम्ही राज्याची पत्रकारिता करता. तुमचे प्रतिनिधी जिल्ह्यात आहेत. त्यांना पाठवा. 87 की 77 नंबरची महिला अधिकारी कोण? त्यांनी स्पीकर ऑन का केला? किरकोळ प्रकरण आहे हे आका कुणासमोर बोलला? सोडून दे असं का सांगितलं? याची चौकशी करा. ही क्लिप 15 दिवस चालणार आहे. लक्षात ठेवा. डीलिट करू नका, असं सूचक विधान सुरेश धस यांनी केलं.
या वर्षीच्या भगवान भक्ती गडावर जो दसरा मेळावा झाला, त्यात आमच्या पंकजा ताईंनी एक वाक्य वापरलं होतं. ज्यांच्याशिवाय धनंज मुंडे यांचं पान हलत नाही, असे वाल्मिक अण्णा. पंकजा ताईंचं हे वाक्य तुमच्याकडे स्टोर असेल तर ते वाक्य काढून ठेवा. कारण आज जो त्या लेडीजचा फोन झालाय तो अतिशय भयानक प्रकरणातील आहे. मग ते पानही धनंजय मुंडेंशिवाय हललंय की नाही हे मला बघायचंय, असंही ते म्हणाले.