AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप’; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता ‘तो’ पोलीस अधिकारी

सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. वाल्मिक कराड प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

'15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप'; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता 'तो' पोलीस अधिकारी
| Updated on: Jan 28, 2025 | 4:48 PM
Share

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी-ज्यांनी वाल्मिक कराडला फरार होण्यास मदत केली होती, त्यासंबंधीचे पुरावे, कागदपत्रं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करावं अशी मागणी धस यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.  यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?   

मुख्यमंत्री येत्या 5 तारखेला आष्टीला येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन साहेबांनी दिलंय. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह जवळपास २८०० कोटी रुपयांचा प्रकल्प माझ्या मतदारसंघात येत आहे. त्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येत आहेत.

बाकीच्या काही गोष्टीबाबत मी साहेबांशी चर्चा केली आहे. त्या संदर्भात पत्रही दिलं आहे. त्यातील पहिलं पत्र आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यात 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी असणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याबाहेर बदल्या कराव्यात, दुसरं वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ते सर्व लोक, त्यांचे नंबर्स पोलिसांना दिले आहेत. त्या सर्वांना सह आरोपी करा, नंतर परळी नगर पालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं. काल ऑडिट म्हटलं होतं. पण स्पेशल ऑडिट झालं पाहिजे. कारण एका एका व्यक्तीच्या नावावर ४६-४६ कोटी रुपयांची बिले उचलली गेली आहेत.  विष्णू चाटे सारख्या आरोपीच्या नावावर ४६ कोटी रुपये  उचलले. एकाच रस्त्यासाठी पाचवेळा पैसे घेतले, असा गंभीर आरोप सुरेश धस यानी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भास्कर केंद्रे नावाच्या पोली अधिकाऱ्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. 15 वर्षांपासून भास्कर केंद्रे हे तिथेच आहेत. त्यांचे स्वत:चे १५ जेसीबी आहेत. १०० राखेचे टिप्पर आहेत. तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची आर्धी पार्टनरशीप आहे. मीडियाने परळीत जाऊन चेक करावं, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?