AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो पाण्याचा साठा करुन ठेवा, ‘या’ दिवशी 24 तास पाणी येणार नाही

मुंबईकरासांठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून शहरातील काही भागांमध्ये 24 तासांसाठी पाण्याचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा आणि पाण्याचा साठा आधीच करुन ठेवा, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

मुंबईकरांनो पाण्याचा साठा करुन ठेवा, 'या' दिवशी 24 तास पाणी येणार नाही
| Updated on: Jan 15, 2024 | 9:01 PM
Share

मुंबई | 15 जानेवारी 2024 : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. येत्या 17 जानेवारीला मुंबईतील काही भागांमध्ये पाणी कपात केलं जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्ण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना या दिवशी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात 17 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेपासून 18 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु राहील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

“मुंबई महापालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन सदर ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी.च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवारी 17 जानेवारी सकाळी 10 वाजेपासून ते गुरुवार 18 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. सदर कामाच्या कालावधीत ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे”, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

‘या’ परिसरांमध्ये पाणी येणार नाही

1) ए विभाग

नेव्हल डॉकयार्ड सप्लाय – सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ४.१५ आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री १.००) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

2) ई विभाग

नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ६.३०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

म्हातारपाखाडी रोड झोन – म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी ८.१५) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डॉकयार्ड रोड झोन – बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.२० ते दुपारी २.५०) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

हातीबाग मार्ग – हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

जे. जे. रुग्णालय – (२४ तास पाणीपुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन – मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४५ ते सायंकाळी ५.५५) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

रे रोड झोन – बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.१५) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

माऊंट मार्ग – रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

3) बी विभाग

बाबूला टँक झोन – मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डोंगरी बी – झोन – नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – * दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.*

डोंगरी ‘ए’ झोन – उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.३० ते रात्री १०.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन – सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० आणि रात्री ११.३० ते मध्यरात्री २.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

मध्म रेल्वे – रेल्वे यार्ड (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

वाडी बंदर – पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.२० ते सायंकाळी ५.३०) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

वाडी बंदर – पी. डिमेलो मार्ग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

आझाद मैदान बुस्टींग – (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.००) – दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, १७ आणि १८ जानेवारी २०२४ रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...