
Dhananjay Munde- Pankaja Munde : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व करिष्माई होते. सर्व जाती-पातीतील कार्यकर्त्यांचा त्यांच्याभोवती गराडा असायचा. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या आणि पुतण्या हे राजकीय पटलावर पकड ठेवून आहेत. पण आता गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण असे बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चानंतर तीव्रतेने विचारल्या जात आहे. छगन भुजबळ, प्रकाश महाजन आणि इतर नेत्यांनी त्यांच्या सदिच्छा कुणाच्या पाठीशी आहे हे जाहीर केले आहे. आता या वादात प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी उडी घेतली आहे. काय म्हणाल्या महाजन?
मुंडेंचा वारसदार कोण?
गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण यावरून ऐन दिवाळीतच चर्चा सुरू झाल्या. त्यात सारंगी महाजन यांनी आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मुंडेंचा वारसदार हे धनंजय आणि पंकजा नाही, ते फक्त प्रॉप्रर्टीचे वारसदार आहेत असा टोला त्यांनी लगावला. दोन्ही बहीण भाऊ हे फक्त खंडणी वसली करतात. लोकांना पैशांसाठी मारणे, लोकांच्या जमनी बळकावणे असे त्यांचे उद्योग आहेत.
या दोघा भावा आणि बहिणींनी फक्त जमीन हडपण्याचं कामं केलं आहे आणि त्यांनी नातेवाईकांची सुद्धा जमीन सोडली नाही आहे मी त्यांची मामी आहे आणि माझी जमीन सुद्धा यांनी हडपली आहे आणि आम्ही यासंदर्भात आत्ता न्यायालयीन लढाई लढत आहोत. हे दोघे भाऊ आणि बहीण फक्त स्वतःच्या स्वार्थाकरिता एकत्र आले आहेत आणि त्यांनी आपला स्वार्थ साधला की ते वेगळे वेगळे होतील असा खोचक टोला सारंगी महाजन यांनी लगावला.
मी अनेक वेळा परळी आणि बीडमध्ये गेली आहे आणि तिथे जनता यांच्या कोणत्या दहशती खाली आहे हे मी बघितलं आहे. माझी जमीन यांनी सोडली नाही. आणि यांचा तो वाल्मीक कराड हा जेल मधून बसून सगळं काही चालवतो. त्याला बीड जेलमधून दुसऱ्या जेल मधे घेऊन जा अशी मागणी सुद्धा झाली होती पण यावर काही झालं नाही, असे सांरगी महाजन म्हणाल्या.
हे दोन्ही भाऊ बहीण हे नालायक आहेत. हे दोघे कधीच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार होऊ शकत नाही यांनी कुठे कार्यकर्ते उभे केले आहेत आणि यांचे कार्यकर्ते हे तुम्हीच शोधून काढा? बीडच्या जनतेने यांच्याकडे पाठ फिरवली तर हे तोंडावर पडतील असा दावा सारंगी महाजन यांनी केला.
मग गोपीनाथ मुंडेंचा वारस कोण?
मुंडेंचे वारसदार हे बीडीची जनता आणि त्यांचे कार्यकर्ते आहे. मुंडेचे रक्तांच्या नात्यातील वारसदार नाही, असे सारंगी महाजन म्हणाल्या. पंकजा आणि धनंजय हे फक्त त्यांचे प्रॉपर्टी चे वारसदार आहेत ते त्यांचे विचारांचे वारसदार नाहीत अशी टीका सारंगी महाजन यांनी केली. करुणा मुंडे हिला आपल्या नवऱ्याबद्दल काही तरी वाटतं त्यामुळे ती बोलते ना. पण धनंजय मुंडेंना काहीच वाटत नाही. या दोघा भावा आणि बहिणीला आपलं कुटुंब सांभाळता येत नाही असे त्या म्हणाल्या. तर टी. पी. मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा चालवतात आणि मी सुद्धा हे ऐकल आहे की बीडमध्ये दहशत आहे म्हणून लोक त्यांचं नाव घेतात.