
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रविवारी रात्रीपासून उमेदवारांना AB फॉर्मच वाटप सुरु झालं होतं. पण काही जागांवर मात्र उमेदवार जाहीर झाले नव्हते. यात परळ, लालबाग मधील वॉर्ड होते. हा भाग शिवसेनेचा स्थापनेपासून बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अजय चौधरी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. परळ, लालबाग, परळगाव, काळाचौकी या विभागातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून तिकीट म्हणजे हमखास विजय हे ठरलेलं गणित आहे. आता शिवडी मतदारसंघाचा वाद मिटला आहे.
प्रभाग 202 मधून श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव इच्छुक होता. मात्र स्थानिक शाखाप्रमुखाचा विरोध असल्याने श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 203 मधून माजी आमदार दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ इच्छुक होत्या. पण त्यांच्याजागी भारती पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
तर प्रभाग क्रमांक 204 मधून माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारून मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बेस्टचे माजी अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांचा पत्ता कट करून किरण तावडे यांना लालबाग मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधव यांना 202 मधून उमेदवारी मिळाल्याने स्थानिक शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांचा मातोश्रीच्या बाहेर गोंधळ.
श्रद्धा जाधव यांना विरोध असताना का उमेदवारी दिली? शिवसैनिकांचा सवाल. फायर आजी सोबत इतर शिवसैनिकांचा श्रद्धा जाधव यांना विरोध.
प्रभाग क्र. 202 श्रद्धा जाधव
प्रभाग क्र. 203 भारती पेडणेकर
प्रभाग क्र. 204 किरण तावडे
मनसेतून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे सेनेतील प्रकाश पाटणकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश. पाटणकरांना शिवसेनेतून मिळाला एबी फॉर्म.
मात्र याच वार्डातून माजी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक नाराज. कुणाल वाडेकर यांचा ऐनवेळेला पत्ता कट झाल्याने शिंदे सेनेत नाराजी उफाळून आलीय.
कुणाल वाडेकर ( विधानसभा प्रमुख )इच्छुक उमेदवार, निकेत पाटील (उपविभाग प्रमुख), अभिजित राणे (शाखाप्रमुख -192) यांचा पक्षाला निर्वाणीचा इशारा