पश्चिम बंगाल, आसाममध्ये अधिक टप्प्यात मतदान घेण्यामागचा कुटील डाव काय?; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

| Updated on: Mar 01, 2021 | 1:16 PM

निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. (why two states election phase more than others?, prithviraj chavan asked)

पश्चिम बंगाल, आसाममध्ये अधिक टप्प्यात मतदान घेण्यामागचा कुटील डाव काय?; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते
Follow us on

मुंबई: निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. तीन राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान होत आहे आणि पश्चिम बंगाल- आसाम या दोनच राज्यात अधिक टप्प्यात मतदान का घेतलं जात आहे? यामागे काय कुटील डाव आहे? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. (why two states election phase more than others?, prithviraj chavan asked)

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. केरळमध्ये 140 जागा, तामिळनाडूत 234 जागा आणि पुद्दूचेरीत 30 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान घेतलं जात आहे. म्हणजे या तिन्ही राज्यांच्या मिळून एकूण 404 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मग आसाममध्ये 126 आणि पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी म्हणजे दोन्ही राज्यांतील एकूण 420 जागांसाठी 7 आणि 8 टप्प्यात मतदान होत आहे. दोन राज्यांसाठी एवढ्या टप्प्यांची गरज काय आहे? या मागे काही कुटील डाव आहे का? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का?

या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली होती. मी निवडणूक आयोगाचा आदर करते, मात्र त्यांनी जिल्ह्यांची विभागणी का केली? पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी 3 टप्प्यात मतदान विभागण्यात आलंय. हे मोदी शाहांच्या सोयीनुसार करण्यात आलंय का?, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला होता. केंद्र सरकार त्यांच्या मंत्रिपदाचा आणि शक्तीचा राज्यांच्या निवडणुकीत दुरुपयोग करु शकत नाही. जर त्यांनी असं केलं तर ती त्यांची खूप मोठी चूक असेल. त्यांना त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल. आम्ही सामान्य लोक आहोत. आम्ही आमचं युद्ध लढू. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्यांनी पैशांचा दुरुपयोग थांबवावा. भाजपने पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध मार्गांनी पैसे पाठवले आहेत,” असंही ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं होतं.

कुठे कधी निवडणुका

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. (why two states election phase more than others?, prithviraj chavan asked)

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान

तामिळनाडूत एक टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.

पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान

पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा
तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा
चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा
सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा
सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा
आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा
मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी (why two states election phase more than others?, prithviraj chavan asked)

 

संबंधित बातम्या:

निवडणूक आयोगाने मोदी शाहांच्या सोयीनुसार टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का? : ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल : मेदिनीपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात TMC च्या कार्यकर्त्याचा मृत्यू, दोघे गंभीर

ममता बॅनर्जींच्या सुनेची सीबीआयकडून दीड तास चौकशी; बँकॉकमधील व्यवहारांचा हिशोब मागितला

(why two states election phase more than others?, prithviraj chavan asked)