आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

| Updated on: Mar 08, 2021 | 8:48 PM

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे (Woman brutally murdered his husband for trivial reasons in Virar).

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या
Follow us on

मुंबई : संपूर्ण देशात आज महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र याच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. घरगुती कारणावरून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात आरोपी पत्नीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत (Woman brutally murdered his husband for trivial reasons in Virar).

नेहा पवार (वय 29) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तर लोकेश जगदीश पवार (वय 30) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. या दोघांचा प्रेमविवाह झालेला असून त्यांना एक 8 वर्षांचा मुलगाही आहे. ते विरार पूर्व मकवाना कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहत होते (Woman brutally murdered his husband for trivial reasons in Virar).

रविवारच्या (7 मार्च) पहाटे साडेतीनच्या सुमारास पती कामावरून घरी आल्यानंतर या दोघात घरगुती कारणावरून वाद झाले. याच वादातून पत्नीने चक्क धारदार चाकू पतीच्या पोटात खुपसून त्याची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना विरार पोलिसांना कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बगाडे, पोलीस उपायुक्त प्रशांत वागुंडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, आरोपी पत्नीलाही आपल्या ताब्यात घेतले.

पोलिसांनी पत्नीची पोलीस ठाण्यात कसून चौकशी केली असता घरगुती कारणावरून ही हत्या केली असल्याचे पत्नीने प्राथमिक पोलीस तपासात कबुल केले. यावरून विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, महिला दिनाच्या दिवशीच आरोपी महिलेला वसई न्यायालयात हजर केले असता तिला 11 मार्चपर्यंत 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस तापासाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : शुन्य टक्के दरानं पीक कर्ज, बाजार समित्यांचं बळकटीकरण, बजेटमध्ये शेतीला काय मिळालं?