Maharashtra Budget on Agriculture | शुन्य टक्के दरानं पीक कर्ज, बाजार समित्यांचं बळकटीकरण, बजेटमध्ये शेतीला काय मिळालं?

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना सारख्या अडचणीच्या काळात शेतीक्षेत्रानं सावरल्याचं सभागृहात सांगितलं. Maharashtra Budget 2021 on Agriculture sector

Maharashtra Budget on Agriculture | शुन्य टक्के दरानं पीक कर्ज, बाजार समित्यांचं बळकटीकरण, बजेटमध्ये शेतीला काय मिळालं?
बजेटमध्ये शेतीला काय?

मुंबई: महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना सारख्या अडचणीच्या काळात शेतीक्षेत्रानं सावरल्याचं सभागृहात सांगितलं. अर्थमंत्र्यांनी शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय भाषणात विविध योजनांविषयी माहिती दिली. (Maharashtra Budget 2021 on Agriculture sector know details)

शेतकऱ्यांना शुन्य टक्क्यानं कर्ज

3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा येईल, असं अजित पवार म्हणाले.

बाजारसमित्यांच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित करण्यात आली.

कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी

शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल स्वरुपात देण्यात येईल, असं अजित पवारांनी घोषित केलं. थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना 33 टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी देण्यात येईल. 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

विकेल ते पिकेल अभियानासाठी शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुरु करण्यात येईल.

प्रत्येक तालुक्यात भाजीपाला रोपवाटिका

प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे राज्यात सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली.

कृषी विद्यापीठांना 600 कोटी

राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान देण्यात येईल.कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास 3 हजार 274 कोटी रुपये तरतूद करण्यात आलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेती क्षेत्राविषयी भाष्य करताना दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या केंद्र सरकारविरोधी आंदोलनाला राज्याचा पाठिंबा असल्याचं जाहीर केले.

संबंधित बातम्या

कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी

चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले

Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

(Maharashtra Budget 2021 on Agriculture sector know details)

Published On - 4:18 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI