कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, परभणी, नांदेड, बीडमध्ये पाठिंबा देण्यात आला. (Agriculture Act)

कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 5:57 PM

औरंगाबाद: दिल्लीत शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशातील शेतकरी उभे राहिले आहेत. केंद्र सरकारने केलेले कायदे जुलमी स्वरुपाचे आहेत. भाजप सरकारनं शेतकऱ्यांवर जुलूम करणारे कायदे केले आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी एक दिवसाचं संसदेचे अधिवेशन बोलवावे, असं आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. (Abdul Sattar demanded center govt should cancelled agriculture act)

मोदी सरकारने तिन्ही कायदे रद्द करुन नवीन कायद्याचा मसुदा तयार करताना शेतकरी,शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतीतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करुन तयार करण्यात यावा, असंही अब्दुल सत्तार म्हणाले. केंद्रानं आणलेले तिन्ही कायदे हे उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोपही सत्तार यांनी केला.

मराठवाड्यातील भारत बंद आंदोलनाचा आढावा

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार औरंगाबादमध्ये रस्त्यावर उतरले होते. त्यांनी औरंगाबाद जळगाव महामार्गावर रस्ता रोको केला होता. सत्तार यांनी एक तास रस्ता रोको केला.

औरंगाबादमध्ये डाव्या संघटनांच्यावतीने देखील रस्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिल्ली गेट परिसरात रस्ता रोखण्यात आला. डाव्या चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी यामध्ये सहभागी झाले होते.

नांदेड

तीर्थक्षेत्र माहुरमध्ये देखील आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या समर्थनार्थ विविध संघटनांनी एकत्र येत माहुरमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला.माहूर मध्ये महाविकास आघाडीसह विविध समविचारी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या.

लातूर

भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी लातूर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ स्वतः होऊन बंद ठेवली आहे. सामान्य दुकानदारांसोबत आडत बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. पहाटेपासून सुरू होणारी भाजीपाला बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहेत. लातूरच्या रस्त्यांवर वाहनेही दररोज पेक्षा कमी प्रमाणात वाहतूक करताना पहायला मिळाली. तर, बससेवाही काळजी घेऊन सुरू ठेवण्यात आली होती. भारत बंदला लातूर मध्ये लोकांनी स्वतः होऊन पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. अगोदरच लॉकडाऊनमध्ये आर्थिक नुकसान झालेल्या व्यापारी आणि इतर लोकांना आता त्यांचं नुकसान नको आहे.त्यामुळे ते स्वतः होऊन बंद ठेवताना पहायला मिळाले. तर, उदगीर, निलंगा आणि अहमदपूर मध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे.

परभणी

दिल्ली येथे केंद्र सरकारच्या नव्या शेतकरी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी परभणीत विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने आज भारत बंद ची हाक देण्यात आली. परभणीत या भारत बंद ला विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा दिला. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन स्थळी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन मुंडण करुन केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी नव्या शेतकरी कायद्यांना विरोध करत गे कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

परभणी शहरातील बस्थानाक परिसरातील उड्डाण पुलावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वंचितच्या कार्यकरत्यांनी घोषणाबाजी करून नव्या शेतकरी कायद्यास विरोध केला.

संबंधित बातम्या:

BHARAT BANDH | शेतकऱ्यांचा राज्यभर एल्गार; बाजार ओस, शेतकरी रस्त्यावर, केंद्र सरकारविरोधात चौकाचौकात निदर्शने

‘शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला चिमटा

(Abdul Sattar demanded center govt should cancelled agriculture act)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.