ग्रीन बिल्डिंग काँग्रेसमध्ये माय होम ग्रुप्सचा डंका, तब्बल 4 पुरस्कारांनी सन्मानित!

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज (27 नोव्हेंबर) ग्रीन बिल्डिंग काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशभरातील तसेच इतर देशातील दिग्गज चेहरे उपस्थित होते. यावेळी माय होम ग्रुप्स कन्स्ट्रक्शनला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये एकूण चार मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

ग्रीन बिल्डिंग काँग्रेसमध्ये माय होम ग्रुप्सचा डंका, तब्बल 4 पुरस्कारांनी सन्मानित!
My Home Groups
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2025 | 9:21 PM

My Home Groups Awards : गेल्या कित्येक वर्षांपासू माय होम ग्रुप्स (My Home Groups) बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. उत्तम गुणवत्ता तसेच ग्राहकांचे हीत केंद्रस्थानी ठेवूनच My Home Groups  आपले काम करते. या ग्रुपच्या उल्लेखनीय कामाची आता दखल घेण्यात आली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्रिन बिल्डिंग काँग्रेस कार्यक्रमात माय होम ग्रुप्स कन्स्ट्रक्शनला एक दोन नव्हे तर तब्बल चार पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय कामाची पावती म्हणून या पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.

My Home Groups ला मिळाले एकूण चार पुरस्कार

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज (27 नोव्हेंबर) ग्रीन बिल्डिंग काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशभरातील तसेच इतर देशातील दिग्गज चेहरे उपस्थित होते. यावेळी माय होम ग्रुप्स कन्स्ट्रक्शनला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये एकूण चार मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार मिळाल्यानंतर आयजीबीसीच्या संस्थापक सदस्यांनी माय होम ग्रुप्स कन्स्ट्रक्शनचे तोंडभरून कौतुक केले आहे. बांधकाम क्षेत्रात हे पुरस्कार फार बहुमोलाचे मानले जातात. असे असताना My Home Groups ला एकूण चार पुरस्कार मिळाल्यामुळे आता देशभरात या ग्रुपचे कौतुक केले जात आहे.

पुरस्काराचे महत्त्व काय?

GREEN BUILDING CONGRESS मध्ये बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला जातो. या कार्यक्रमात पुरस्कार मिळणे फार प्रतिष्ठेचे मानले जाते. कित्येक कंपन्या या पुरस्कारासाठी शर्यतीत असतात. परंतु चांगले काम करणाऱ्यांनाच या पुरस्काराचा मान मिळतो. My Home Groups ला वेगवेगळ्या श्रेणीत या ग्रिन बिल्डिंग काँग्रेस कार्यक्रमात एकूण चार पुरस्कार मिळाले. हा पुरस्कार मिळाला तेव्हा खाली बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच मंचावर उपस्थित असलेल्यांनीही ग्रिन होम ग्रुपच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी माय होम ग्रुप्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर My Home Groups ने आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.