AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथे लोक अचानक होतात टकले, टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका

अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक नागिरकांचे केस गेले असून त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथे लोक अचानक होतात टकले, टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; 'या' लोकांना सर्वाधिक धोका
बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले?
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 11:07 AM

चीनमध्ये सध्या HMPV विषाणूने धूमाकूळ घातला असून भारतातही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मात्र HMPV ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा, शेगांव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धूमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसांत चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून, कुटुंब ची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण परसले आहे.

टक्कल व्हायरसचा धुमाकूळ

मिळालेल्या माहितीनुसार, शेगावच्या अनेक गावांत सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत. आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते, यामुळेच नागिरक घाबरले आहेत. विशेष म्हणजे शेगावजवळील अनेक गावांत हा व्हायरस पसला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत, त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे , त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत.

कशामुळे पडतंय टक्कल ?

मात्र अनेक गावातील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही त्यातून वाचू शकलेल्या नाहीत. पण हा प्रकार नेमका का घडतोय हो अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. शांपू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केसगळती आणि टक्कल पडत असावे असं डॉक्टरांचं मत आहे. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शांपू वापरलेला नाहीये, त्याला हातही लावला नाही त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे .

पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

गेल्या तीन दिवसांपासून गावातील काही लोकांमध्ये अचानक केसगळती सुरू झाली. आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कटोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 असे केसगळतीचे रुग्ण आढळून आले. ते नागरिक जे पाणी वापरत होते, त्याचा नमुना आम्ही तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि सदर रुग्णांवर प्राथमिक उपचार केले आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यातर्फे सांगण्यात आलं.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिर राबवण्याचे आवाहन केले आहे. या गावामधे आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नव्हती.कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामधे केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहेत याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गीते यांना निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.