Municipal Council Elections 2025 Result Date: मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्या जाहीर होणार नाही, हायकोर्टाचा मोठा दणका
नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होईल.

Municipal Council Elections 2025 Result Date: राज्यातील नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीतल डावात मचाळा अजून थांबलेला नाही. नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या लागणार होता. पण तो आता लांबणीवर पडला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Mumbai High Court of Nagpur Bench) सर्व निकाल हा 21 डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एक्झिट पोलही सध्या जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्या मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार नाही. आता निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.
सर्व निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी
उद्या होणारी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार होते. पण नागपूर खंडपीठाने सर्व नगरपालिकांची मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश नुकत्याच झालेल्या सुनावणीत देण्यात आले. पण तोपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. तर आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
एक्झिट पोलची लगबग नाही
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आज या ठिकाणी मतदान होणार नव्हते.
पण या नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा या 24 नगर परिषदांच्या निकालावर त्याचा प्रभाव पडू शकतो, असा युक्तीवाद दाखल याचिकांमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार, नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील असे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगावर नाराज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झाल्याचे दिसले. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. त्याचा निकाल पुढे जातोय. हे पहिल्यांदाच असं होतंय. हे यंत्रणांचं अपयश आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही. हे यंत्रणांचं फेल्यूअर असल्याचे फडणवीस म्हणाले.
