OYO रूममध्ये प्रेमाचा भयानक अंत, आधी वाद अन् नंतर खेळ खल्लास, महाराष्ट्र हादरला
Nagpur Crime : नागपूरमधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमधे प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

अलिकडील काळात प्रियकर आणि प्रेयसीमधील वाद काही नवीन नाहीत. मात्र आता नागपूरमधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमधे प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे. रुचिता भांगे मृतक तरुणीचे नाव, प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओयो हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरात हे तरूण जोडपं एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेलं होतं. ओयो हॉटेलमधे दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारुन पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
वादानंतर हत्या
समोर आलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे असं असू तिचे वय अंदाजे 22 आहे. या घटनेतील प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती माहिती दिली की, रुचिता आणि सौरव हे काल सायंकाळच्या सुमारास फेटरी परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये गेले होते. या दोघांमध्ये वाद होता. हॉटेलमध्ये मुक्कामी असताना या दोघांमधील वाद वाढला.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वाद वाढल्याने रागाच्या भरात सौरवने रुचिताच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली व तिचा काही काळानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ओरोपी सौरव पळून गेला. आज सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदे आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. पोलिसांनी सौरवचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी अशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
