AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खतरनाक बायको, लव्ह सेक्स धोका, बिर्याणीचा कट.. रात्रभर नवऱ्याच्या प्रेताशेजारी बसून पाहत होती पॉर्न व्हिडिओ

लग्न हे पवित्र नातं आहे. विश्वासाच्या पायावर हे नातं टिकून राहतं. पण सध्याच्या सहजतेने उपलब्ध होणाऱ्या भौतिकसुखाच्या विश्वात माणूस स्वार्थी बनत चालला आहे. आपल्याच जोडीदाराला दगा देताना आपण काय करतोय याचा साधा विचारही करत नाहीत. असचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलय.

खतरनाक बायको, लव्ह सेक्स धोका, बिर्याणीचा कट.. रात्रभर नवऱ्याच्या प्रेताशेजारी बसून पाहत होती पॉर्न व्हिडिओ
Women Killed Husband
| Updated on: Jan 23, 2026 | 9:09 AM
Share

सध्या विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढू लागली आहे. असच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीने विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. तिने नवऱ्यासाठी खास बिर्याणी बनवली. त्यात तिने झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली. नवऱ्याला प्रेमाने बिर्याणी खाऊ घातली. बिर्याणीत झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळलेली असल्यामुळे नवऱ्याला गाढ झोप लागली. त्यावेळी तिने तिच्या प्रियकराला घरी बोलवून घेतलं. नंतर दोघांनी मिळून त्याची हत्या केली. आंध्र प्रदेशच्या गुंटुर जिल्ह्यात चिलुवुरु गावात ही घटना घडली.

सुरुवातीला तिने नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दोन्ही संशयितांना अटक झाली आहे. फॉरेन्सिक तपासणीतून लोकम शिवांगाराजू याचा श्वास कोंडला गेल्यामुळे मृत्यू झाल्याचा समोर आलं. पत्नी लक्ष्मी माधुरीवर लोकम शिवांगाराजूच्या हत्येचा आरोप आहे. माधुरीचे गोपी नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते, हे पोलीस तपासातून समोर आलय. गुन्हा घडला त्या रात्री माधुरीने झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळून बिर्याणी बनवली. नवऱ्याला तिने ही बिर्याणी खाऊ घातली. ही बिर्याणी खाऊन शिवांगाराजूला गाढ झोप लागली. त्यानंतर माधुरी आणि गोपीने शिवांगराजूचं तोंड उशीने दाबलं. अखेर श्वासकोंडला गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

सकाळ झाल्यानंतर तिने हंबरडा फोडला

दुसऱ्यादिवशी सकाळी माधुरीने गावकऱ्यांसमोर शिवांगराजूचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. सकाळ झाल्यानंतर तिने हंबरडा फोडला. गावकरी गोळा झाल्यानंतर शिवांगराजूचा अचानक मृत्यू झाल्याचा तिने सांगितलं. शिवांगराजूचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि मित्रांना शरीरावर काही जखमा आणि रक्ताचे डाग दिसले. त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यू श्वासकोंडल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. नैसर्गिक मृत्यूची शक्यता फेटाळून लावली.

मोबाइल फोनमधून धक्कादायक बाबी समोर

माधुरी आणि गोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. माधुरीच्या मोबाइल फोनची फॉरेन्सिक तपासणी झाल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. रात्रभर ती नवऱ्याच्या प्रेताशेजारी बसून पॉर्न व्हिडिओ पाहत होती.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.