Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime News : नागपूरच्या बसस्थानकात प्रवासी महिलांसोबत धक्कादायक प्रकार..

Nagpur Crime News : नागपूरच्या बसस्थानकात प्रवासी महिलांसोबत धक्कादायक प्रकार..

| Updated on: Mar 07, 2025 | 10:58 PM

Nagpur Central Bus Stand Video : नागपूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट अत्याचारानंतर आता नागपूरमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे.

नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर एक तरुण महिलांशी गैरवर्तन करत असल्याचं आढळून आलं आहे. मंगेश असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एकीकडे स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरण अद्यापही ताजं असतानाच नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात देखील आता महिलांच्या विनयभांगाचा प्रकार समोर आलेला बघायला मिळत आहे. त्यामुळे बसस्थानकावरील महिला कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात एक तरुण महिलांशी गैरवर्तन करत असल्याचं आढळून आलं आहे. हा तरुण बसमध्ये चढणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मंगेश नामक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

Published on: Mar 03, 2025 04:07 PM