मोठी बातमी! कराळे मास्तर गेम फिरवणार? नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप, काँग्रेसचं टेन्शन वाढलं, मतमोजणीमध्ये थेट…

राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार तीन ठिकाणी महायुतीचे तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

मोठी बातमी! कराळे मास्तर गेम फिरवणार? नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप, काँग्रेसचं टेन्शन वाढलं, मतमोजणीमध्ये थेट...
nitesh karale
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 7:16 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार तीन ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघामधून भाजपचे कौस्तुभ गावंडे हे आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे किरन सरनाईक हे आघाडीवर आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंंघामध्ये महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सतिश चव्हाण हे पिछाडीवर आहेत.

दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठं ट्विस्ट पहायला मिळत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात सध्या भाजपचे सुधाकर कोहळे हे आघाडीवर आहे, मात्र ही आघाडी अवघ्या 4000 मतांचीच आहे, तर दुसऱ्या क्रमाकांवर काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे आहेत, आणि तिसऱ्या क्रमांकावर नितेश कराळे हे आहेत. तीन्ही उमेदवारांमध्ये मतांचं फार अंतर नाहीये. त्यामुळे अशा स्थितीमध्ये आता पहिल्या पसंतीच्या मतदानावर या मतदारसंघात निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे.

Loading...

कदाचित या निवडणुकीचा निकाल हा दुसऱ्या पसंतीच्या मतदानापर्यंत देखील जाऊ शकतो. त्यातच आता कराळे मास्तरांकडून आधीच असा दावा करण्यात आला आहे की, दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मतं ही त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये जर नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल हा दुसऱ्या पसंतीच्या मतदानावर ठरला तर त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही मतमोजणी सुरूच असल्यामुळे या निकालाबद्दल कोणतंही निश्चित असं भाकीत करता येत नाही. मात्र या मतदारसंघात कराळे मास्तर यांनी भाजप आणि काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे, एवढं नक्की. सध्या तरी या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार  सुधाकर कोहळे हे आघाडीवर आहेत, मात्र ही आघाडी फार जास्त नाहीये. त्यामुळे आता या मतदारसंघातून कोण बाजी मारणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us