“आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था”; हिवाळी अधिवेशनात आमदार निवासातील धक्कादायक प्रकार; या आमदारांनी व्हिडीओच शेअर केला…

| Updated on: Dec 22, 2022 | 12:45 AM

वेटर टॉयलेटमधील पाण्याचा वापर करून आमदारांसाठी असेल्या कपबश्या धूत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था; हिवाळी अधिवेशनात आमदार निवासातील धक्कादायक प्रकार; या आमदारांनी व्हिडीओच शेअर केला...
Follow us on

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. कधी सीमावाद, तर कधी राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून सरकार आणि विरोधकांचा वाद टोकाला जात आहे. सीमावादावरून दोन्ही गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी नागपूरमधील आमदार निवासामधील एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

 

आमदार अमोल मिठकरी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये त्यांनी आमदार निवासामधील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा कसा वापर केला जातो आहे.

त्याचा त्यांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांना सरकारवर टीका करत कंत्राटदारावरही टीका केली आहे.

आमदार अमोल मिठकरी यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने आमदार निवासामधील आमदारांसाठी असलेल्या टॉयलेटचा कसा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे.

तेही त्यातून त्यांनी दाखवले आहे. अमोल मिठकरी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे.त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह.

हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच त्यांनी कोट्यवधींचे टेंडर देऊनही अशी चुकीच्या पद्धतीने आमदारांच्या जेवण आणि चहापाण्याची व्यवस्थी केली जाते असंही त्यांनी त्या व्हिडीओमधून दाखवले आहे.

व्हिडीओमध्ये वेटर टॉयलेटमधील पाण्याचा वापर करून आमदारांसाठी असेल्या कपबश्या धूत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

तर आझादी का अमृत महोत्सव असा हॅशटॅग वापरून त्यांनी स्वातंत्र्य भारतातील व्यवस्थेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था हा वाद वाढणार असल्याचे दिसून येत आहे.