Nagpur Jail : नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात घडला भावनिक अनुबंध, कारागृह ध्वजदिनानिमित्त गळाभेट उपक्रम

बंदिवानांचं जीवन अतिशय खडतर असते. कुटुंबाशिवाय त्यांना जगावं लागते. अशावेळी बायको, मुलं-मुली यांची त्यांना आठवण येते. त्यांना भेटता यावं, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून आपल्या कुटुंब प्रमुखाला भेटता आल्यानं मुलं-महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. 

Nagpur Jail : नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात घडला भावनिक अनुबंध, कारागृह ध्वजदिनानिमित्त गळाभेट उपक्रम
कारागृह ध्वजदिनानिमित्त गळाभेट उपक्रम
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 10:18 PM

नागपूर : कारागृहातील सिध्ददोष बंदिवानांच्या किशोरवयीन मुलांसाठी प्रत्यक्ष ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आज मध्यवर्ती कारागृह येथे आयोजन करण्यात आले होते. किशोरवयीन मुला-मुलींनी आपापल्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मनातील भावनांना (An emotional bond) व्यक्त करत हितगुज केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 120 बंदिवानांच्या 189 पाल्यांची आप्तेष्ठांशी प्रत्यक्षरीत्या भेट घडवून आणण्यात आली. 1 सप्टेंबर रोजी कारागृह ध्वजदिनाचे (Flag Day) आयोजन करण्यात येते.  त्यानिमित्त कारागृह विभागाव्दारे राज्यात सर्वत्र बंदीवानांच्या पाल्यांना प्रत्यक्ष गटण्याच्या ‘गळाभेट’ हा अभिनव उपक्रम आज नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) घेण्यात आला.

nagpur jail nn 1

अनेकांना भेटता आले पालकांशी

कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्मिता साठे, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव हाडे, वामन निमजे, तुरुंगाधिकारी दीपक भोसले, माया धतुरे यांच्यासह कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1 सप्टेंबर 1969 रोजी कारागृह विभागास ध्वज प्रदान केला होता. त्यादिवसापासून प्रथमत:च राज्यात सर्वत्र कारागृह विभागाचा ध्वजदिन साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात कित्येक मुलामुलींना त्यांच्या पालकांशी भेटता आले नव्हते. मात्र, यंदा कारागृह विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले.

हे सुद्धा वाचा

भेटीचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर

या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुलामुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला. बंदिवानांनी आपापल्या मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य, पैसाअडका व राजीखुशी संदर्भात हितगुज यावेळी केले. कारागृह ध्वजदिनानिमित्त आज मध्यवर्ती कारागृहाच्या प्रांगणात सकाळी 7.45 वाजता कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बंदिवानांचं जीवन अतिशय खडतर असते. कुटुंबाशिवाय त्यांना जगावं लागते. अशावेळी बायको, मुलं-मुली यांची त्यांना आठवण येते. त्यांना भेटता यावं, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून आपल्या कुटुंब प्रमुखाला भेटता आल्यानं मुलं-महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.