योग्य विचार करा, योग्य निर्णय घ्या, पंकजा मुंडे यांना कुणाचा सल्ला?; पंकजा मुंडे सल्ला मानणार?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्ताने नोटीस बजावली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असूनही पंकजा मुंडे यांना नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मुद्द्यावरून आता राजकारण पेटलं आहे.

योग्य विचार करा, योग्य निर्णय घ्या, पंकजा मुंडे यांना कुणाचा सल्ला?; पंकजा मुंडे सल्ला मानणार?
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 9:59 AM

वाशिम | 26 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरकारकडे सात-आठ साखर कारखान्यांना मदतीची प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामध्ये आपल्याही साखर कारखान्याचं नाव होतं. पण माझा कारखाना सोडून इतर सर्व कारखान्यांना मदत केली. माझाच कारखाना का वगळला? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेमुळेच त्यांच्या कारखान्याला नोटीस आली असावी, अशी शंका प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. तर आता आणखी एका नेत्याने पंकजा मुंडे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना मोठा सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करतोय. भाजपला मोठं करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. आता त्यांच्याच कन्येवर पक्षाच्या माध्यमातून अन्याय केला जातोय ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी योग्य तो विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्ला अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

मला काही झालं नसतं

यावेळी अनिल देशमुख यांनी भाजपकडून आपल्याला ऑफर होती असा दावा केला आहे. ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा म्हणजे सव्वा दोन वर्षा पूर्वी मला भाजपची ऑफर होती. मी जर तेव्हा समझोता केला असता तर मला काही झालं नसतं. मात्र तेव्हाचं आमचं सरकार पडलं असतं, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

न्याय द्यायचा नसेल तर

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार अपात्रतेची सुनावणी विधानभवनात पार पडली. मात्र पुढील सुनावणी 13 ऑक्टोंबरला होणार आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी वेळकाढूपणा केल्या जात आहे. तारीख पे तारीख दिली जात असून कोणाला न्याय द्यायचा नसेल तर असा वेळ काढूपणा केल्या जातो. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह सुनावणी घ्यायला पाहिजे, असं देशमुख म्हणाले.

बावनकुळे माफी मागा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधात बातम्या येऊ नये म्हणून पत्रकारांना धाब्यावर नेऊन चहा पाजण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तशी ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा मी जाहीर निषेध करतो.

पत्रकार लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. पत्रकारांच्या बाबतीत असं वक्तव्य करणे एका पक्षाच्या व्यक्तीला शोभत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बंधूंची बावनकुळे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.