इंटर मॉडेल स्टेशनसाठी तब्बल 40 हजार झाडांची कत्तल, नागपुरात वृक्षप्रेमींचा कडाडून विरोध

| Updated on: Jun 05, 2021 | 10:28 PM

नागपूरमध्ये होणारी तब्बल 40 हजार झाडांची कत्तल थांबवावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. (AAP activist environmentalist protest ajani forest nagpur)

इंटर मॉडेल स्टेशनसाठी तब्बल 40 हजार झाडांची कत्तल, नागपुरात वृक्षप्रेमींचा कडाडून विरोध
AAP PROTEST
Follow us on

नागपूर : जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना नागपूरमध्ये पर्यवरणवादी आणि आप पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी नागपूरमध्ये होणारी तब्बल 40 हजार झाडांची कत्तल थांबवावी अशी मागणी करत आंदोलन केले. देशातील पहिले इंटर मॉडेल स्टेशन नागपूरमध्ये तयार होणार आहे. याच कारणामुळे येथे 40 हजारपेक्षा जास्त झाडांची कत्तल होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्यामुळे अजनी भागातील रेल्वेमेन्स शाळेजवळ हे आंदोलन करण्यात आले. (AAP activist and environmentalist protest to protect 40 thousand tree of Nagpur Ajani forest)

आप तसेच पर्यावरणावाद्यांचे चिपको आंदोलन

देशातील पहिले इंटर मॉडेल स्टेशन नागपूरच्या अजनी भागात तयार केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकल्पांतर्गत 44. 4 एकर क्षेत्रातील तब्बल 40 हजारपेक्षा जास्त झाडे कापली जाणार आहेत. झाडांची एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्यामुळे येथे पर्यावरणवाद्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्यांनी वृक्षतोडीला थेट विरोध केला आहे. आज जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधत काही आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्ते तसेच पर्यावरण प्रेमी यांनी आंदोलन केले. त्यासाठी नागपुरातील पर्यावरण प्रेमी संघटना एकत्र आल्या. आज या संघटना तसेच आप पक्षाने ‘सेव्ह अजनी वन’ नावाने निदर्शन केले.

झाडांची कत्तल करणे योग्य नाही- आप

अजनी भागातील रेल्वेमेन्स शाळेजवळ आम आदमी पक्षच्या वतीने अजनी वन वाचविण्यासाठी झाडाला कवटाळून चिपको आंदोलन करण्यात आले. यावेळी सेव्ह अजीन वन नावाच्या पाट्यासुद्धा आंदोलकांच्या हातात होत्या. अजनी वन शहराच्या मध्यवर्ती भागात असून हे वन शहराच्या ऑक्सिजनची गरज भागवते. अशा वेळी विकासाच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करणं योग्य नसल्याचं मत आम आदमी पक्षाचे संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या :

क्वारंटाईन सेंटरमधून 23 पंखे, नळाच्या तोट्या, बल्ब पळविले; चहा विकणाऱ्या भामट्याला बेड्या

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

नागपूरमध्ये 180 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर, मेयो रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम

(AAP activist and environmentalist protest to protect 40 thousand tree of Nagpur Ajani forest)