AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल पंपावर किरकोळ वाद, गुंडाचा कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला, नागपूरमध्ये खळबळ

सोमलवाडा येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरील (Petrol Pump) कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. (nagpur petrol pump employee attacked cctv camera)

पेट्रोल पंपावर किरकोळ वाद, गुंडाचा कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला, नागपूरमध्ये खळबळ
कुख्यात गुंड जमीर खान याची हत्या करण्यात आलीय.
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 7:48 PM
Share

नागपूर : सोमलवाडा येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरील (Petrol Pump) कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला. यावेळी कर्मचाऱ्याला मारहाणसुद्धा करण्यात आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( CCTV camera) कैद झाला असून पेट्रोल भरताना झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Petrol Pump employee attacked by Three men in Nagpur incident caught in CCTV camera)

वाद टोकाला गेल्यामुळे चाकू हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील सोमलवाडा येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर एक गुंड गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. गुंडासोबत त्याचे इतर दोन मित्रही होते. हा वाद नंतर टोकाला गेल्यामुळे गुंडाने कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा तसेच चाकू घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये स्वत:चा बचाव करताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाला.

गुंडासोबत इतर दोघांनकडून मारहाणीचा प्रयत्न

दरम्यान, गुंडासोबत आणखी दोन मित्र आले होते. या दोघांनीही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत वर्दळ असलेल्या नागपूर-वर्धा महामार्गावर हा पेट्रोल पंप आहे. घटनास्थळावरून सोनेगाव पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खडबड माजली आहे.

नागपूरच्या रेल्वे पोलिसांकडून ब्राऊन शुगर जप्त

राज्यात ड्रग्जची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढलीय. नागपूरच्या रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त केली. एका बेवारस बॅगमध्ये या ड्रग्जच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. दोन जून रोजी पोलिसांनी ही कारवाई केली होती.

नागपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी पोहोचली असता नियमित पेट्रोलिंगवर असलेल्या रेल्वे पोलिसांना जनरल बोगीमध्ये एक बेवारस बॅग दिसली. त्या बॅगबद्दल विचारपूस केली असता कोणीही त्यावर आपला हक्क सांगितला नव्हता. त्यामुळे ती बॅग ताब्यात घेऊन चेक केली असता त्यात छोट्या छोट्या पुड्या दिसून आल्या. त्यानंतर त्याची माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाला देण्यात आली. त्यानंतर बॅगेमध्ये ब्राऊन शुगर असल्याचं उघड झालं. 310 पुड्यांमधील ब्राऊन शुगरचं 21.490 ग्रॅम वजन होतं, त्याची बाजारात किंमत 2 लाख 14 हजार 900 रुपये असल्याचा अंदाज पोलिसांना बांधला होता. .

इतर बातम्या :

पत्नीनेच फोडले पतीच्या गैरकृत्याचे बिंग, हाय प्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार

‘माझ्या भाच्याला काही बोलू नको’, बापाचा संतापाचा पारा चढला, थेट मेव्हण्यावर वार, गोंदिया हादरलं !

शारीरिक संबंधाचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात सहा जणांकडून गँगरेप

(Petrol Pump employee attacked by Three men in Nagpur incident caught in CCTV camera)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल