Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

| Updated on: Dec 11, 2021 | 7:07 PM

ती रात्री घरी एकटीच होती. पण, काही त्याला भाव देईना. त्यामुळं तो संतापला. तिला मारहाण करू लागला. दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. शेवटी त्यानं तिच्या गळ्याला स्कार्फनं गुंडाळला. तिच्या हत्येचा प्रयत्न केला

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण...
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : ही घटना आहे कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. आदेशचे एका मुलीवर प्रेम होते. पण, गेल्या काही दिवसांपासून ती त्याला टाळू लागली. त्यानं संधी पाहून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण, तीनं नकार देताच त्यानं गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ती ओरडताच तो पळून गेला. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

ती त्याला टाळायला लागली

आदेश तिरपुडे (वय 23) याचे शेजारच्या मुलीसोबत प्रेम होते. पण, तो काही कामधंदा करत नव्हता. ही बाब तिच्या लक्षात आली. शिवाय तो एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात अडकला. त्यामुळं ती त्याला टाळू लागली. तिचे आईवडील हातमजुरी करतात. तीही नर्सिंगचा अभ्यास करत आहे. त्याच्यात तिला काही भविष्य दिसले नाही. ती बिचारी घरोघरी जाऊन रुग्णांची सेवा करते. आपल्या कुटुंबाला हातभार लावते.

रात्री शिरला प्रेयसीच्या घरात

आदेश तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता. पण, ती त्याला काही भाव देईना. त्यामुळं तो पार संतापला होता. तरीही त्याच्या भेटीची संधी कधी मिळेल, याची वाट पाहत होता. ती संधी त्याला शुक्रवारी मिळाली. कन्हान येथे शुक्रवारी मंडईचा कार्यक्रम होता. मंडईनिमित्त मुलीचे आई-वडील आणि भाऊ कन्हानला गेले. ती घरी एकटीच होता. याची त्याला कुणकुण लागली. तो तिला भेटायला आला. वेळ रात्रीची होती. ती घरी एकटीच असल्याची संधी त्यानं शोधली होती.

चुलतभाऊ धावला मदतीला…

ती रात्री घरी एकटीच होती. पण, काही त्याला भाव देईना. त्यामुळं तो संतापला. तिला मारहाण करू लागला. दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. शेवटी त्यानं तिच्या गळ्याला स्कार्फनं गुंडाळला. तिच्या हत्येचा प्रयत्न केला. स्कार्फ छताच्या पाईपलाही बांधला. तेवढ्यात शेजारी राहणार तिचा चुलतभाऊ धावून आला. त्यानं तिची त्याच्या तावडीतून सुटका केली. तोपर्यंत आदेशनं आपल काही खरं नाही समजून पळ काढला. कोराडी पोलीस आता आदेशच्या शोधासाठी निघालेत.

Chandrapur | भद्रावतीचा तहसीलदार अडकला जाळ्यात; 25 हजार रुपयांची घेत होता लाच

Nagpur | ऑटोरिक्षाच्या भाववाढीवरून चालक-ग्राहकांत मतभेद, मध्यम मार्ग निघणार कसा?

Nagpur Health | सिकलसेल झालाय काय काळजी घ्याल? समाजात 17 डिसेंबरपर्यंत जनजागृती