AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur | भद्रावतीचा तहसीलदार अडकला जाळ्यात; 25 हजार रुपयांची घेत होता लाच

लाच देणे शक्य नसल्यानं संबंधित ग्राहकानं नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तहसीलदाराला अटक केली.

Chandrapur | भद्रावतीचा तहसीलदार अडकला जाळ्यात; 25 हजार रुपयांची घेत होता लाच
भद्रावतीचे तहसीलदार
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 11, 2021 | 6:20 PM
Share

चंद्रपूर : भद्रावतीचे तहसीलदार डॉ. नीलेश खटके याला 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी ही कारवाई केली. तहसीलदार डॉ. नीलेश खटके याला त्यांच्या कार्यालयातच लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण

वीटभट्टीसाठी मातीची गरज असते. या मातीच्या उत्खननाची परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांकडं असतात. यासाठी तहसीलदाराने लाच मागितली होती. पण, लाच देणे शक्य नसल्यानं संबंधित ग्राहकानं नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तहसीलदाराला अटक केली.

दोन महिन्यांपूर्वीच आले होते बदलून

विटा भट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीच्या उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. दोन महिन्यांपूर्वीच पोंभुर्णा तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत खटके यांची भद्रावती येथे बदली झाली होती. खटके याला अटक झाल्यानं महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तहसील कार्यालयातील कर्मचारी धास्तावले

तहसील कार्यालयात या ना त्या कारणासाठी नागरिकांना यावे लागते. अशावेळी काही कर्मचारी लाचेची मागणी करतात. ज्यांचे काम अडते असे नागरिक लाच देऊन कामे काढून घेतात. पण, ज्यांना शक्य नसते. त्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. या कारवाईमुळं लाच घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. आपली कुणी तक्रार तर करणार नाही ना, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे.

Nagpur | ऑटोरिक्षाच्या भाववाढीवरून चालक-ग्राहकांत मतभेद, मध्यम मार्ग निघणार कसा?

Nagpur Health | सिकलसेल झालाय काय काळजी घ्याल? समाजात 17 डिसेंबरपर्यंत जनजागृती

Best from the Waste | घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती; किचन गार्डनसाठी मनपातर्फे प्रोत्साहन

Follow Us
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती