Best from the Waste | घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती; किचन गार्डनसाठी मनपातर्फे प्रोत्साहन

नागपुरात 50 ते 60 हजार घरांमध्ये घरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे प्रयत्न मनपातर्फे सुरु आहेत. यामधून खत निर्मिती होईल आणि कचऱ्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकेल. मनपातर्फे नागरिकांना घरी खत निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Best from the Waste | घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती; किचन गार्डनसाठी मनपातर्फे प्रोत्साहन
कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रशिक्षण दे्ताना.
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 4:09 PM

नागपूर : महापालिकेतर्फे कचऱ्यापासून जैविक-गांडूळखत निर्मिती करण्यात येते. आता किचन गार्डन विकसित करण्यावर भर दिला जात आहे. नरेंद्रनगरातील अजित कुलकर्णी आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जाधव यांनी ओल्या कचऱ्यापासून जैविक खत निर्मिती करून किचन गार्डन विकसित केले आहे. धंतोली झोनच्यावतीने त्यांचा सत्कार शनिवारी (ता. 11) सुयोगनगर उद्यानात सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

खताचा वापर किचन गार्डनसाठी

घरामध्ये ओला कचरा फार काळ साठवून ठेवला तर दुर्गंधी सुटते. काही नागरिक परिसरातील मोकळे प्लॉट अथवा मैदानात कचरा टाकून देतात. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, घरात साचलेल्या याच ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत बनविण्याचा प्रकल्प काही प्रबुद्ध नागरिकांनी सुरू केला आहे. गांडूळखत प्रकल्पासाठी चार बाय दोन फूट बाय फूट या आकाराचे एक भांडे बनविण्यात येते. यामध्ये कचरा टाकण्यासाठी दोन भाग करण्यात येतात. त्यानंतर भांड्यात 250 ते 300 गांडूळ सोडले जातात. भांड्यात ओला कचरा टाकल्यानंतर हे गांडूळखत बनवण्याचे काम सुरू करतात. या खताचा वापर आपण स्वतःच्या गार्डनमध्ये सुद्धा करू शकतो.

खत निर्मितीतून भाजीपाला लागवड

विशेष म्हणजे, यामुळे परिसरात कोणतीही दुर्गंधी पसरत नाही. रोगराई नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त असून नागरिक मोठ्या प्रमाणात खत निर्मिती करून आपल्या घरात भाजीपाल्याची लागवड करीत आहे. स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, खराब झालेल्या फळभाज्या असे फूड वेस्ट मटेरिअल या भांड्यात टाकले जाते. फक्त भांड्यामध्ये दुधाचे पदार्थ, दूध, तेलकट पदार्थ, प्लास्टिक, लोखंड व काचा हे टाकणे टाळावे. गांडूळखत तयार होण्यासाठी साधारणपणे पाच महिने लागतात. खत बनवत असताना काही द्रव्यदेखील तयार होते. या द्रवाचा वापर कीटकनाशक म्हणून करू शकतो.

घरीच वांगी, पालक, मेथीचे उत्पादन

सुयोगनगर उद्यानात धंतोली झोनतर्फे जनजागरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेतर्फे नागरिकांना कचऱ्याचे विलगीकरण करण्याची माहिती देण्यात आली. तसेच घरातील ओला कचऱ्याच्या मदतीने जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित करण्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सहायक आयुक्त बडगे आणि त्यांचा सहकाऱ्यांनी अजित कुलकर्णी आणि श्री जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे विकसीत किचन गार्डनची माहिती प्राप्त करून घेतली. त्यांच्या घरी वांगी, पालक, मेथी, कोबी यासारखा भाजीपाला लावण्यात आला आहे. यावेळी झोनल आरोग्य अधिकारी धर्मेंद्र पाटील आणि अन्य सहकारी उपस्थित होते.

कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रयोग

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नागपुरात 50 ते 60 हजार घरांमध्ये घरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे प्रयत्न मनपातर्फे सुरु आहेत. यामधून खत निर्मिती होईल आणि कचऱ्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकेल. मनपातर्फे नागरिकांना घरी खत निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकल्पात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्यास त्यांना घरीच जैविक भाजीपाला पिकविता येईल. नागपुरात अविनाश तेंभुरने, हेमराज वालदे, ऋचा हेमंत चौधरी, विनायकनगर, सुहासिनी गाडे, वसंतनगर, एस एम काटकवार, वसंतनगर, चंचल भिडे, वसंतनगर, विधुला विंचलने, वसंत नगर, रत्ना कंधारी, पांडे लेआऊट यांनी सुद्धा आपल्या घरी कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे.

Nagpur | धोकादायक ! पतंग पकडण्याचा नाद जीवावर बेतला, छतावर चढला नि खाली पडला

Nagpur Suicide | विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टर महिलेने स्वतःला संपविले, सुसाईट नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.