Nagpur | धोकादायक ! पतंग पकडण्याचा नाद जीवावर बेतला, छतावर चढला नि खाली पडला

Nagpur | धोकादायक ! पतंग पकडण्याचा नाद जीवावर बेतला, छतावर चढला नि खाली पडला
पतंग विक्रेत्यांवार कारवाई करताना.

गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारात मयूर पतंग पकडण्यासाठी छतावर चढला. अचानक पाय घसरल्यानं छतावरून तो खाली पडला. यात मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेडिकलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी मयूरला मृत घोषीत केले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 11, 2021 | 3:49 PM

नागपूर : नायलॉन मांजाविरोधात महापालिकेनं कारवाई सुरू केली. अशातच पतंग पकडण्यासाठी छतावर जाणारा युवक खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मयूर वैद्य असं युवकाचं नाव आहे. तो कोतवालीनगरातील शिवाजीनगरात राहतो.

गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारात मयूर पतंग पकडण्यासाठी छतावर चढला. अचानक पाय घसरल्यानं छतावरून तो खाली पडला. यात मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेडिकलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी मयूरला मृत घोषीत केले. कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मनपाकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाई

राष्ट्रीय हरीत लवादानं नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मनपानं दोन डिसेंबरलाच परिपत्रक काढले. यानुसार मांजाच्या खरेदी-विक्रीवर बंदी लादण्यात आली आहे. मांजा आढळल्यास कारवाई करण्यात येते. हजार रुपये दंड ठोठावण्यात येतोय. तरीही नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याच दिसून आलंय.

नायलॉन मांजाचा मोठा व्यवसाय

मकरसंक्रांतीच्या पूर्वीपासूनच पंतगोत्सव सुरू होतो. त्यामुळं मनपानं आतापासूनच कारवाई करणं सुरू केलंय. नायलॉन मांज्याच्या व्यवसायातून दरवर्षी सुमारे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल होते. मांजाचा व्यवसाय फायद्याचा असल्यानं व्यापारी चोरून-लपून हा व्यवसाय करतात. कारवाई झाली तरी पर्वा नाही, असा काही व्यापाऱ्यांचा समज आहे.

प्लास्टिक पतंग विक्रीवरही बंदी

हौशी लोकं पतंग उडवितात. खाली पडल्यानंतर ती तशीच पडून असते. प्लास्टिकची असेल, तरी ती तशीच पडून राहते.
त्यामुळं प्लास्टिक पतंग विक्रीवर मनपानं नियमानुसार बंदी घातली. पण, प्लास्टिकच्या पतंगांची विक्री सुरूय आहे. मनपाचं उपद्रव शोधपथक कारवाई करते. मात्र, त्यांच्याकडील असलेलं मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळं हे व्यवसाय सुरूच राहतात.

Nagpur Suicide | विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टर महिलेने स्वतःला संपविले, सुसाईट नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण

Nagpur | नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल, जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील?

Nagpur Crime | चोरी करून पळाला, प्रेयसीच्या होता संपर्कात; तिने केली पोलिसांना मदत आणि…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें