Nagpur | नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल, जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील?

नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी बदलला. येवढा कमजोर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Nagpur | नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल, जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील?
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 1:39 PM

नागपूर : नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष राहिलेत. दोन मंत्र्यांच्या दबावात त्यांनी नागपूर विधान परिषदेचा उमेदवार काँग्रेसने बदलला. त्यामुळं नाना पटोले यांनी आजच्या आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी बदलला. येवढा कमजोर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

318 पेक्षा जास्त जागा मिळतील

नागपुरातील घडामोडीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचलंय. भाजपला १४ डिसेंबरच्या निकालात ३१८ पेक्षा मत महाविकास आघाडीला मिळालेली असतील. असं म्हणतं जे पक्ष सांभाळू शकत नाही, ते निवडणुका काय लढणार, असा टोला नाना पटोले यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

प्रस्ताव 405 कोटींचा, दिले पाच कोटी

राज्य सरकारने इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी दिलेले पाच कोटी अत्यंत तुटपुंजा निधी आहे. 405 कोटींचा प्रस्ताव असताना 5 कोटी रुपये देणे ही शरमेची बाब आहे. अनेक ओबीसी मंत्री असताना इम्पेरीकल डाटा गोळा करायला फक्त 5 कोटी दिले. पाच कोटी रुपयांत काहीही होणार नाही. सरकारने तोंडाला पानं पुसलेत. हे सरकार झोपलंय. काही पोपट खोटं बोलतायत, असा घणाघातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

निवडणुका पुढे ढकला

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं भंडाऱ्यात ओबीसी मतदार नाराज आहेत. काहींनी तर घरासमोर पाट्या लावल्यात. हे आरक्षण रद्द झाल्यानं आमच्या घरी मत मागायला येऊ नका, असं मतदारांचं म्हणण आहे. भंडारा येथे मतदारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आज आरक्षण देत असल्यानं आजचा डेटा लागेल. यामुळं भंडारा-गोंदियातील निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. एका महिन्यात डाटा गोळा करणं शक्य आहे. या सरकारला ओबीसी समाजाच्या जागेवर सुभेदार लढवायचे आहेत. त्यामुळं ते ओबीसींचे आरक्षण टिकवू शकले नाहीत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Nagpur Crime | चोरी करून पळाला, प्रेयसीच्या होता संपर्कात; तिने केली पोलिसांना मदत आणि…

Nagpur Congress : काँग्रेस मंत्र्यांच्या दबाव, उमदेवार बदलणं हा नाना पटोलेंना दणका? नागपुरात चर्चा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.