Nagpur Suicide | विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टर महिलेने स्वतःला संपविले, सुसाईट नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण

Nagpur Suicide | विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टर महिलेने स्वतःला संपविले, सुसाईट नोटमध्ये लिहिले आत्महत्येचे कारण
प्रातिनिधीक फोटो

माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे सुसाईट नोटमध्ये लिहिले. वैवाहिक जीवन संपुष्ठात आल्यानंतर आकांशा नैराश्यात गेल्या होत्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 11, 2021 | 2:26 PM

नागपूर : विषारी इंजेक्शन टोचून डॉक्टर महिलेनं स्वतःला संपविल्याची घटना जरीपटक्यात घडली. सुसाईट नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले. कोणताही डॉक्टर माझे उपचार करून शकत नाही. त्यामुळं मी आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहीलं.

गुरुवारी रात्री या घटनेचा उलगडा झाला. अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचं नाव आहे. रात्री नऊ वाजले तर आकांक्षा खोलीबाहेर पडल्या नाहीत. त्यामुळं त्यांच्या आईवडिलांनी त्यांची खोली गाठली. पाहतात तर काय त्या बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्या होत्या. बाजूलाच चार-पाच सिरींज होत्या. त्यातील दोन रिकाम्या होत्या. आईवडिलांनी डॉक्टरांना बाहेरून बोलावले. डॉक्टरांनी आकांशा मृत असल्याचं सांगितलं. तेव्हा आईवडिलांच्या पायाखालची जमीनच घसरली.

पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय

आकांशाचे वडील निवृत्तीचं जीवन जगतात. तर आई एलआयसीमध्ये काम करते. भाऊ बेंगळुरू येथे नोकरीला आहे.
एमबीबीएस, एमडी केल्यानंतर 2016 मध्ये आकांक्षाचे लग्न झालं. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करायच्या.
वैवाहिक जीवनात कटुता आल्यानं आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळं आकांक्षा नागपुरातल्या जरीपटक्याच्या नागसेननगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर राहत होत्या.

माझ्यावर कोणताही डॉक्टर उपचार करू शकत नाही

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आपली व्यथा मांडताना कोणताही डॉक्टर माझ्यावर उपचार करू शकत नाही. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे सुसाईट नोटमध्ये लिहिले. वैवाहिक जीवन संपुष्ठात आल्यानंतर आकांशा नैराश्यात गेल्या होत्या. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.

पोलिसांनी केली अकस्मात मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनास्थळ गाठले. पीएसआय नाईकवाडे हेही पोहचले. मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजेल. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वैद्यकीय अहवालानंतर गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Nagpur Congress : काँग्रेस मंत्र्यांच्या दबाव, उमदेवार बदलणं हा नाना पटोलेंना दणका? नागपुरात चर्चा

Wardha | धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडल्या अळ्या, वाचा कुठल्या वसतिगृहातील आहे हा प्रकार?

Yavatmal | मुंगोली हादरले, घरांना का पडल्या भेगा? घरांची छपरं कशी उडतात! वाचा…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें