भाजपचं महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेचं टार्गेट ठरलं, शिंदे गटाचे काय होणार?; बावनकुळे यांची मोठी माहिती

| Updated on: Jun 10, 2023 | 8:34 AM

मोदी सरकारचा 9 वर्षांचा लेखाजोखा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अभियान हाती घेतलं आहे. याचाच एक भाग म्हणून 48 लोकसभेत 48 सभा घेणार आहोत.

भाजपचं महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेचं टार्गेट ठरलं, शिंदे गटाचे काय होणार?; बावनकुळे यांची मोठी माहिती
chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असल्याने भाजपने या निवडणुकीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी भाजपने आपलं टार्गेटही फिक्स केलं आहे. विधानसभा आणि लोकसभेला किती जागा जिंकायच्या याचं टार्गेट भाजपने ठरवलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याची माहितीही दिली आहे. तसेच शिंदे गटाचं काय होणार याची माहितीही त्यांनी दिली आहे.

भाजपने 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ही यंत्रणा उभी केली आहे. आमच्यासारखीच ताकद आम्ही शिंदे यांच्या उमेदवारांसाठीही लावू. आम्ही 200 प्लस विधानसभा आणि 40 प्लस लोकसभा निवडून आणण्याचं टार्गेट ठेवलं आहे. महाविकास आघाडीला पराभूत करून आम्ही सत्तेत येऊच, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे सुद्धा वाचा

48 लोकसभेत 48 सभा घेणार

विधानसभा आणि लोकसभा निवडणूक प्रमुखांची नियुक्ती ही निवडणूकीची तयारी करण्यासाठी करण्यात आली आहे. कोणीही निवडणूक लढवण्याच्या भानगडीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मोदी सरकारचा 9 वर्षांचा लेखाजोखा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अभियान हाती घेतलं आहे. याचाच एक भाग म्हणून 48 लोकसभेत 48 सभा घेणार आहोत. मग अशोक चव्हाणांचा मतदारसंघ असो की पृथ्वीराज चव्हाणांचा. आम्ही प्रत्येक ठिकाणी सभा घेणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथेही प्रचंड मोठी सभा होत आहे, असं त्यांनी जाहीर केलं.

आजपासून प्रवास सुरू

आजच्या सभेच्या माध्यमातून लोकसभेचा आमचा प्रवास सुरु होतोय. आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे निवडणूकीची तयारी करावीच लागते. मतांचं कर्ज म्हणून जनतेसमोर कामांचा लेखाजोखा मांडला जातोय. आम्ही दिलेला जाहिरनामा आम्ही पूर्ण केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

40 हजार लोक उपस्थित राहणार

गेल्या वेळेस अमित शाह पुण्यात येऊन गेले. आता मराठवाड्यात येत आहेत. तिकडे बारामतीत कुणी जाईल, नागपूरात कुणी येईल. आजच्या नांदेड येथील सभेला 40 हजार पेक्षा जास्त लोक येणार आहेत. आजच्या सभेत काही पक्षप्रवेश होणार आहेत. प्रमुख नेते या सभेत येणार आहेत. पंकजा मुंडे सुद्धा या सभेत येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.