NMC election | नागपुरात भाजपाचा मायक्रो प्लानिंगवर भर; शिवसैनिक म्हणतात, निवडणुकीसाठी पुढाकार कोण घेणार?

| Updated on: Jan 16, 2022 | 6:30 AM

फेब्रुवारी महिन्यात नागपूर महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. याचा विचार करता मनपात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं मायक्रो प्लानिंगवर भर दिला आहे. तर शिवसेनेमधील काही कार्यकर्ते नाराज दिसून येतात. ज्यांनी पदे भूषविली त्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

NMC election | नागपुरात भाजपाचा मायक्रो प्लानिंगवर भर; शिवसैनिक म्हणतात, निवडणुकीसाठी पुढाकार कोण घेणार?
नागपूर महापालिका
Follow us on

नागपूर : आगामी नागपूर महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीत भाजपनं (BJP) मिशन 120 हाती घेतलंय. या निवडणुकीत 120 नगरसेवक निवडून आणून महापालिकेत चौथ्यांदा सत्तेत येण्याचा निर्धार भाजपनं केलाय. गेल्या निवडणुकीत भाजपनं 108 नगरसेवक निवडून आणण्याचं टारगेट ठेवलं होतं. त्यात त्यांना यश मिळालं होतं. गेल्या 15 वर्षात भाजपनं जी कामं केली त्याला मतदार प्रतिसाद देतील आणि आमचं मिशन 120 पूर्ण होईल, असा विश्वास भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केलाय. शिवाय जुने चेहरे बदलण्याचा संकेतही त्यांनी दिलेत.

बोनस समजून महापौरांची बॅटिंग

शहरात सध्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू आहे. नगरसेवक कामांचे भूमिपूजन करत आहेत. काम झाली नसली, तरी कामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचे कारणही तसेच आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळं तत्पूर्वी कामांचे क्रेडिट घेण्यासाठी सारे प्रयत्न दिसून येतात. मनपाच्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष हा प्रचारातही आघाडीवर दिसून येतो. बोनस समजून महापौर दयाशंकर तिवारी शहरातची धुरा सांभाळत आहेत. भाजपचे मायक्रो प्लानिंग सुरू आहे. निवडणूक जाहीर होताच उमेदवारांची नावे जाहीर करणे एवढेच काम भाजपने शिल्लक ठेवले आहे.

शिवसेनेत अंतर्गत धुसफूस

शिवसेनेत महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होताना दिसत नाही. आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना नागपूरचे संपर्क प्रमुख करणे अनेक माजी पदाधिकाऱ्यांना पटलेले नाही. त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीवरून काहींनी नाराजी व्यक्त केली. माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची घड्यात हातात धरली. माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे हेही मनपा निवडणुकीपासून दूरच दिसतात. माजी उपमहापौर किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे हे दोनच नगरसेवक शिवसेनेकडे आहे. मंगला गवरे या पक्षात राहतील की नाही, काही खरे नाही असं काही शिवसैनिकांना वाटते. माजी नगरसेवक बंडू तळवेकर, किशोर पराते, अलका दलाल असे काही शिवसैनिक स्वबळावर लढण्यास इच्छुक दिसतात. पण, प्रभाग तीन सदस्यांचा असल्यानं तीन तिघाडा काम बिघाडा असं होऊ शकतं. त्यांना दुसरे दोन सक्षम उमेदवार शोधावे लागतील.

गाजराचा हलवा, संकेत म्हात्रेच्या आवाजाचा हिंदी डबिंगमध्ये जलवा! अल्लू अर्जूनसह कुणाकुणासाठी डबिंग?

Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान

Viral : ‘पूर्ण कपडे घाल, नाहीतर फ्लाइटमध्ये येऊ देणार नाही’, विमान कंपनीच्या वागणुकीवर भडकली मॉडेल