Vijay Wadettiwar: नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर! विजय वडेट्टीवारांच्या मोठा आरोप, चंद्रपुरात कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?

Vijay Wadettiwar on One Crore Offer to Congress Corporators: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये पॅचअप झाल्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकरांवर निसरडा वार केलाच. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना एक कोटींची ऑफर असल्याचा धक्कादायक खुलासा केला.

Vijay Wadettiwar: नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर! विजय वडेट्टीवारांच्या मोठा आरोप, चंद्रपुरात कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
विजय वडेट्टीवार खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर महापालिका
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 24, 2026 | 12:15 PM

Vijay Wadettiwar And MP Pratibha Dhanorkar: चंद्रपूरमध्ये भाजपच नाही तर काँग्रेसला पण फुटीचा शाप लागला आहे. भाजपच्या फुटीचा फायदा घेत काँग्रेसने मुसंडी मारली. पण त्यांच्यातही फाटाफूट समोर आली. काँग्रेसअंतर्गतच दोन गट स्थापन झाले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी 14 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे महापालिका ताब्यात घेण्याऐवजी दोघांच्या श्रेयवादाची लढाई समोर आली. त्यानंतर काँग्रसेचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादावर तोडगा काढल्याचे समजते. अर्थात पॅचअप झाले असले तरी वडेट्टीवार यांनी भाजपसह धानोरकरांवर वार केलाच. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वॉर संपण्याची तशी चिन्ह नाहीत.

काँग्रेस नगरसेवकांना एक एक कोटींची ऑफर

तर काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना एक कोटींची ऑफर दिल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर लावला. भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सत्ता भाजपकडे आहे आणि पैसा पण आहे. माझ्या कानावर नगरसेवकांना एक एक कोटी रुपये देण्याची ऑफर असल्याचे आले आहे.इतकेच नाही तर काही नगरसेवकांना पदही देण्याची ऑफर देण्यात आली आहे. पद आणि पैसा यामुळे काय जादू होते हे सांगणं आता कठीण आहे. किती त्याला बळी पडतात, बळी पडणार नाही, हे भाष्य आता करणं योग्य नाही.पण सत्ता स्थापनेसाठी इतरांची मदत घेतल्याशिवाय काँग्रेस आणि भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सेनेने वंचितसोबत 8 नगरसेवकांचं एक गट तयार केला आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत चांगल्या जुन्या जाणत्या काँग्रेस नगरसेवकांची तिकीटं कापली. ती कुणी कापली, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या धानोरकरांना टोला लगावला.

त्यांचा महापौर पदासाठी अट्टाहास

तर चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकर सांगतील तोच महापौर होईल असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. महापौर आपला असावा असा खासदारांचा अट्टाहास आहे. हा शब्द मी मुद्दामहून वापरतो. महापालिकेत काँग्रेसचे 27 तर आघाडीचे 3 नगरसेवक आहेत. खासदारांनी संख्याबळ जमवण्याचा शब्द दिला आहे. महापौर होण्यासाठी त्या बहुमत जुळवतील असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. स्थायी समिती 5 वर्षे आमच्या ताब्यात असेल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसतंर्गत वादावर पडदा पडल्याचे समोर येत आहे.