Nagpur Crime | पचास लाख दे, नहीं तो तेरे बाप के पास भेज दुँगा, नागपुरात नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 19, 2022 | 11:47 AM

बळजबरीने खंडणी वसूल (Ransom Recovery) करण्याचा प्रकार समोर आलाय. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. एका भूखंडावर कब्जा करून तो परत न देण्याचा गुंडांचा इरादा आहे. पन्नास लाख रुपये दे नि भूखंड हवा असेल, तर घेऊन जा, अशी धमकी गुंडांनी दिली.

Nagpur Crime | पचास लाख दे, नहीं तो तेरे बाप के पास भेज दुँगा, नागपुरात नेमकं काय घडलं?
हुडकेश्वर पोलीस ठाणे
Follow us on

नागपूर : हुडकेश्‍वर ठाण्याच्या हद्दीत खंडणीची घटना समोर आलीय. सचिन देवराव नवघरे हे हुडकेश्वर येथे राहतात. त्यांच्या वडिलांनी हुडकेश्वरच्या सर्वज्ञ सोसायटीत (Sarvajna Society) 2001 मध्ये प्लाट खरेदी केला होता. तेव्हा तो 80 हजार रुपयांचा झाला होता. आता त्या प्लाटची किंमत वाढली आहे. परंतु, सचिन यांना या प्लाटवर बांधकाम केले नाही. त्याठिकाणी कंपाऊंड घातले. अधूनमधून प्लाटवर दे भेट देत असतात. या भूखंडावर 2013 मध्ये दुसऱ्यानेच कब्जा केला. राकेश घोसेकर आणि मुश्ताक शेख यांनी त्याठिकाणी शेडही बांधले. देवराव नवघरे (Devrao Navghare) तिथं गेले व त्यांनी आरोपींना हटकले. तेव्हा राकेश घोसेकर व त्याच्या साथीदारांनी चाकूचा धाक दाखविला. जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. त्यामुळं देवराव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

दहा लाख घे नि गुमान निघ

फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सचिन नवघरे हे आपल्या भूखंडावर गेले. तेव्हा आरोपींनी त्यांनाही पिटाळून लावले. येथे तू आलासच कसा, असे म्हणून धमकावले. तेरे को तेरा बाप के पास भेंज दुंगा, अशीही धमकी दिली. दहा लाख रुपये घे नि गुमान निघ. नाहीतर पन्नास लाख रुपये दे. तेव्हाच आम्ही तुझ्या भूखंडावरून कब्जा सोडू असं म्हटलं. या प्रकरणात गणेशनगर येथील राकेश घोसेकर, नंदनवन येथील राकेश मोटे, हरीश मोटे, मोठा ताजबाद येथील शेख मुस्ताक शेख अशी आरोपींची नावे आहेत.

समझोत्यासाठी पाठविली माणसे

राकेश घोसेकर व त्याच्या गुंडांनी सचिन नवघरेकडे काही माणसं पाठविली. तुझ्या भूखंडाची कागदपत्र आम्हाला दे. अन्यथा भूखंड हवा असल्यास पन्नास लाख रुपये आम्हाला दे. त्यानंतरच आम्ही या भूखंडावरील कब्जा सोडू, अशी ऑफर दिली. परंतु, सचिन यांना तो भूखंड विक्री करायचा नाही. त्यामुळं तो दुसऱ्याला देण्याचा प्रश्नच नाही. यासंदर्भात सचिन नवघरे यांनी गुन्हे शाखेत तक्रार केली. हुडकेश्वरचे ठाणेदार सार्थक नेहते, हवालदार एच. सी. परेश हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Nagpur Crime | अलविदा स्टेटस ठेऊन डॉक्टरने स्वत:ला संपविले, स्वत:च रुग्णालयात टोचले इंजेक्शन, चिठ्ठीमध्ये लिहिले मृत्यूचे कारण

Nagpur Police | हरविलेले मोबाईल पोलिसांनी शोधले, परत मिळाल्याचा आनंद मालकांच्या चेहऱ्यावर, किती मोबाईल केले परत?

Golwalkar Guruji | माधव गोळवलकर गुरुजी जयंती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक