राज्यपालांवर विरोधकांची टीका, फडणवीसांनी विरोधकांची ‘मळमळ’ काढली, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 23, 2021 | 5:39 PM

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील जो काही अध्यादेश आहे पहिल्यांदा ज्या स्वरुपात पाठवला होता तसा मंजूर झाला असता तरी कोर्टात स्थगिती आली असती. राज्यपालांनी ती बाब समोर आल्यानंतर सरकारला सूचना केली.

राज्यपालांवर विरोधकांची टीका, फडणवीसांनी विरोधकांची मळमळ काढली, नेमकं काय म्हणाले?
devendra fadnavis
Follow us on

नागपूर : ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राज्यपालांनी रोखल्यानंतर दैनिक सामनामधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली होती. सामनामधून राज्यपालांवर करण्यात आलेली टीका ही दर्जाहीन टीका आहे. राज्यपालांच्या पदाचा सन्मान हा समजून घेतला पाहिजे. राज्यपालांनी चूक दाखवून दिली ती तुम्हाला सुधारुन घ्यावी लागली. यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसतेय ती या टीकेतून दिसतेय. अशा प्रकारे किती जहरी आणि घाणेरडी टीका केली तरी टीकाकारांची प्रवृत्ती दिसते. राज्यपालांवर आणि त्या संस्थेवर कोणताही परिणाम होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सामना आणि राज्यपालांवर टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

पाहा व्हिडीओ


पहिला अध्यादेश मंजूर केला असता तर स्थगिती

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील जो काही अध्यादेश आहे पहिल्यांदा ज्या स्वरुपात पाठवला होता तसा मंजूर झाला असता तरी कोर्टात स्थगिती आली असती. राज्यपालांनी ती बाब समोर आल्यानंतर सरकारला सूचना केली. सरकारनं सुधारित अध्यादेश पाठवला, त्यासंदर्भात सुधारित माहिती माझ्याकडे नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुप्रीम कोर्टात राज्य सरकारनं वेळ वाढवून घेतली

इम्पेरिकल डेटा संदर्भात केंद्र सरकारनं नकार दिला असता देवेंद्र फडणवीस यांनी तो इम्पेरिकल डेटा नसून तो सेन्सस डेटा आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अध्यादेश काढला आहे. सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनं वेळ वाढवून घेतलीय, तुमची माहिती दुरुस्त करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजप हा लढणारा पक्ष

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आमची भेट घेतली. राज्यसभेची जागा बिनवरोध करा अशी त्यांनी मागणी केली. 12 आमदारांचं निलबंन मागं घ्या अशी कोणतीही मागणी झाली नाही. भाजप हा सौदेबाजी करणारा पक्ष नसून लढणारा पक्ष आहे.

सामनात काय म्हटलं होतं?

राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारा सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.

इतर बातम्या:

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु नका, सामनातून राज्यपाल कोश्यारींना उघड इशारा

सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हाच आमचा एककलमी कार्यक्रम; प्रविण दरेकरांचा राष्ट्रवादीला इशारा

Devendra Fadnavis slam Saamana and Sanjay Raut over criticize editorial published Daily Saamana over Governor Bhagatsingh Khosyhari