नवाब मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चार शब्दात उत्तर

| Updated on: Nov 10, 2021 | 3:58 PM

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपासंदर्भात विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी माझं ट्विट आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया पुरेशी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चार शब्दात उत्तर
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपासंदर्भात विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी माझं ट्विट आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया पुरेशी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढावा, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे. आशिष शेलार प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्यापेक्षा जास्त त्याचं वजन नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवाब मलिक यांच्या आरोपावपर अधिक बाष्य करणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचं दिसून आलं.

नागपूरचा उमेदवार कोण?

विधान परिषद निवडणुकीचा नागपूरचा उमेदवार कोण असेल? याबाबत लवकरचं मिटींग घेऊ आणि त्यामध्ये भाजपता उमेदवार ठरवू, असं फडणवीस म्हणाले आहेत. केंद्रीय कमिटी निर्णय घेईल, असं फडणवीस म्हणाले आहेत. नागपूरमधून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय.

एसटीच्या संपाबाबत सरकार असंवेदनशील

एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. सरकार हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि त्यातून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा.

इतक्या आत्महत्या होऊनही सरकार असंवदेनशील आहे. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढून सरकारनं दिलासा द्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

Devendra Fadnavis gave statement on Nawab Malik allegations in only four words