समृद्धीसारखा नागपूर ते गोवा महामार्ग तयार करणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला रस्ते विकासाचा प्लान

दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे फास्ट चांगला विकास करायचा आहे. आम्हाला 20-20 ची मॅच खेळायची आहे, असंही ते म्हणाले.

समृद्धीसारखा नागपूर ते गोवा महामार्ग तयार करणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला रस्ते विकासाचा प्लान
समृद्धीसारखा नागपूर ते गोवा महामार्ग तयार करणारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 3:14 PM

गजानन उमाटे, टीव्ही ९, नागपूर : समृद्धीसारखा नागपूर ते गोवा महामार्ग तयार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रस्ते विकासाचा प्लानचं त्यांनी सांगितला. नागपूर ते गोवा हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून जाईल. कनेक्टिव्हीटी वाढवायची आहे. राज्यातील कुठल्याही भागात 8 ते 10 तास पोहचता येईल, असे रस्ते तयार करायचे आहेत, असंही ते म्हणाले.

चांगला विकास करायचाय

नवीन सरकार हे फायलींवर बसणारे नाही. हे काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे फास्ट चांगला विकास करायचा आहे. आम्हाला 20-20 ची मॅच खेळायची आहे, असंही ते म्हणाले.

अडचणी सांगा, आम्ही सोडवू

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी नरेडको विदर्भला सरकारच्या वतीनं पूर्ण सहकार्य मिळेल. बिल्डर्ससोबत सामान्य माणसांचं हित जपणारी नरेडको ही संघटना आहे. व्यवसायास समोर असलेल्या अडचणी मांडा आम्ही त्या सोडऊ. मी मुख्यमंत्री असताना देशातलं पहिलं रेरा आपण महाराष्ट्रात सुरु केला, असंही त्यांनी सांगितलं.

मोठ्या शहरांच्या विकासाचा प्लान

काही बिल्डर्समुळे ही कम्युनिटी बदनाम झाली होती. पण रेरा कायद्यामुळे विश्वासार्हता तयार झाली. रेरा कायदा देशात सर्वाधिक यशस्वी महाराष्ट्राने केला. एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता मी मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व मोठ्या शहरांचा विकासाचा प्लान तयार केला.

विदर्भाचा चेहरा बदलेल

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा चेहरा बदलेल. समृद्धी महामार्ग नेक्स्ट इकोनॅामीकल कॅारिडॅार असणार आहे. स्वातंत्र्यापासून ते 2015 पर्यंत मुंबई एमएमआर रिजनमध्ये तीन लाख कोटी रुपये इन्फ्रास्टक्चरवर खर्च केले. तेवढेच मी पाच वर्षांत केले, असल्याची माहिती त्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.