Cancer Institute | भीती कॅन्सरची! नागपुरातील इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला गती द्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी घेतला आढावा

| Updated on: Dec 30, 2021 | 9:21 AM

कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळं कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

Cancer Institute | भीती कॅन्सरची! नागपुरातील इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला गती द्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी घेतला आढावा
नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूटचा आढावा घेताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख.
Follow us on

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत आहे. येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळं कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक बुधवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासह नागपूर कॅन्सर रुग्णालयासाठी काम करणारे संबंधित उपस्थित होते.

 

76.10 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

श्री. देशमुख म्हणाले, या इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी सुमारे 76.10 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यत देण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट उभारणी करीत असताना बांधकाम कशा पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या सुविधा असणार आहेत. याबाबतची माहिती वैद्यकीय संचालक यांनी घ्यावी. बांधकाम करीत असताना यंत्रसामग्री, सोयी सुविधा आणि मनुष्यबळ निर्मिती कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याबाबतची माहितीही देण्यात यावी. तसेच औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय यांनी कर्करोग रुग्णालय बांधताना टाटा स्मृती कर्क रुग्णालयाची मदत घेतली आहे. या इन्स्टिट्यूट उभारणीसाठीही मदत घेण्यात यावी. निविदा प्रक्रिया ते काम पूर्ण होईपर्यंतचा कालावधी याचा समावेश करुन बांधकामाबाबतचा कालबद्ध आराखडा तयार करण्यात यावा. रुग्णालय ठिकाणी शांततेची आवश्यकता असल्याने साऊंड प्रूफ यंत्रणा कशी बसविता येईल याबाबतही इन्स्टिट्यूट उभारणीदरम्यान विचार करण्यात यावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 

डॉ. कांबळे यांचे योगदान मोठे

मध्यभारतात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी मेडिकलमधील तत्कालीन कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांनी दहा ते बारा प्रस्ताव तयार केले होते. पॉवरपॉंईट प्रेझेंटेशन झाले. मात्र कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार करण्याबाबत मागील सरकार उदासीन होते. बांधकामापूर्वी यंत्रसाठी पैसे देण्याचा अफलातून प्रकार भाजप सरकारने केला होता. यामुळे डॉ. कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 21 जून 2017 रोजी दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे असे निर्देश दिले होते. 2019 मध्ये विधानसभेत हा विषय हाताळला असताना नव्यानेच झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत रेंगाळत असलेला कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्‍न निकाली काढत बांधकामाला मंजुरी दिली. नागपूर सुधार प्रन्यासकडे बांधकामाची जबाबदारी दिली.

Crime | तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापडा; सात लाखांचा गांजा जप्त

Nagpur Omicron | नागपूर हादरले! तीन ओमिक्रॉनबाधित सापडले; थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर कसे येणार निर्बंध?